आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगात कापूस उत्पादनात 10 टक्क्यांची वाढ शक्य; 254 लाख टन उत्पादन होण्याचा अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- चालू बाजार वर्ष २०१७-१८ मध्ये कापसाचे जागतिक उत्पादन १० टक्क्यांनी वाढून २५४ लाख टनापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी जगभरात झालेल्या २३०.५ लाख टनापेक्षा हे २३.५० लाख टन जास्त आहे. जागतिक संस्था ‘इंटरनॅशनल कॉटन अॅडव्हायजरी कमिटी’ (आयसीएसी) च्या अहवालात असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जगातील कापूस पेरणी क्षेत्रात झालेल्या वाढीचा हा परिणाम असल्याचे या अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. कापूस पेरणीचे क्षेत्र वाढून ३२० लाख हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. गेल्या वर्षीच्या २९० लाख हेक्टरपेक्षा यंदा १०% जास्त क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली आहे. भारतात आॅक्टोबर ते सप्टेंबर कापसाचे वर्ष मानले जाते.  
 
चांगल्या किमतीमुळे पेरणी क्षेत्रात वाढ  
कापसाला चांगली किंमत मिळत असल्याने पेरणी क्षेत्रात वाढ नोंदवण्यात आली असल्याचे या अहवालात म्हटले आहे. वर्ष २०१६-१७ मध्ये कापसाच्या किमतीची सरासरी इतर पिकांच्या तुलनेत चांगली राहिल्याने पेरणी वाढली असल्याचेही मत यामध्ये नोंदवण्यात आले आहे.  
 
भारत दुसरा मोठा उत्पादक देश  
चीन, भारत आणि अमेरिका जगातील सर्वात जास्त कापसाचे उत्पादन घेणारे देश आहेत. यात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयसीएसीनुसार, या वर्षी कापसाची जागतिक मागणी २.७ टक्क्यांनी वाढून २५२.२ लाख टन राहण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी ते २४५.६ लाख टन होते. भारत, पाकिस्तान, तुर्की, बांगलादेश, व्हिएतनाम आणि ब्राझीलमधील कारखान्यांमधील मागणीतही किरकोळ वाढ होण्याचा अंदाज आहे. 
 
अमेरिका सर्वात मोठा निर्यातक : अमेरिका ४० टक्क्यांच्या भागीदारीसह जगातील सर्वात मोठा निर्यातक देश आहे. वर्ष २०१७-१८ मध्ये अमेरिकेतून ३१ लाख टन कापसाची निर्यात होणार आहे. बांगलादेश १८ टक्के भागीदारीसह जगातील सर्वात मोठा आयातक देश ठरला आहे. २०१७-१८ मध्ये बांगलादेश १४ लाख टन कापूस आयात करण्याचा अंदाज आहे.
 
बातम्या आणखी आहेत...