आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रोत्साहनात्मक म्युझिकमधून स्वीडनचे रेस्तराँ कमावताहेत 10% जास्त नफा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टॉकहोम- स्वीडनच्या मोठ्या रेस्तराँ चेनच्या काही शाखांमध्ये विक्रीत १० टक्के जास्त वाढ नोंदवण्यात येत आहे. यामागचे कारण या रेस्तराँमध्ये वाजवण्यात येत असलेले म्युझिक आहे. एका पिझ्झा कंपनीच्या १६ शाखांमध्ये ही नवीन प्रणाली लागू करण्यात आली. काही मोठ्या हॉटेल्सनीदेखील आपल्या रेस्तराँमध्ये असा प्रयोग केल्यानंतर त्यांचे उत्पन्न वाढले.  

या नव्या प्रणालीचे नाव आहे, “साउंडट्रॅक युवर ब्रँड’. ते असे म्युझिक वाजवतात ज्यामध्ये ब्रँडची झलक दिसते. यामुळे ग्राहकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तसेच ग्राहक जास्त समाधानी होतात. ‘साउंडट्रॅक युवर ब्रँड’चे सीईओ ओला सार्स यांनी सांगितले की, ‘विशेष प्रसंगानुसार काही विशिष्ट प्रकारचे लोक येतात. अशा वेळी त्यांच्यासाठी जागेचेही खूप महत्त्व असते. अशा परिस्थितीत ग्राहक आणि ब्रँडसाठी उपयुक्त वातावरण तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या सिद्धांतावर आधारित प्रणाली तयार करण्यात आली आहे. जसे की, शहराच्या सेंटरमध्ये नाष्ट्याच्या वेळी जे म्युझिक ऐकवले जाईल तेच सायंकाळच्या वेळी रोमँटिक असेल. सर्वसामान्यपणे ग्राहकांना रेस्तराँमध्ये चांगले वाटावे यासाठी म्युझिक ऐकवले जाते. अशा ठिकाणी विशिष्ट नियोजन करून ऐकवले जात नाही.

ग्राहकांच्या आवडीनिवडी समजणे अवघड असल्यामुळेच या प्रणालीला तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सोपे बनवावे लागणार आहे. आम्हीदेखील तेच केले आहे. अाम्ही ब्रँडला योग्य वाटेल अशाच म्युझिकची निवड करतो आणि योग्य वेळी ग्राहकांना तेच एेकायला मिळते.’ यासाठी स्टॉकहोमची संशोधन संस्था एचयूआयने बराच काळ रेस्तराँमध्ये सुरू असलेल्या बॅकग्राउंड म्युझिकचा अभ्यास केला. या अभ्यास गटाचे नेतृत्व करणारे प्रो. स्वेन डॉफॅल्ड यांनी सांगितले की, ‘रेस्तराँमध्ये म्युझिकच्या प्रभावासंबंधी हा सर्वात मोठा अभ्यास अहवाल आहे. योग्य म्युझिक वाजवण्यात आले तर विक्रीवर चांगला परिणाम होईल. सामान्य म्युझिक वाजवून पाहा, त्याच ग्राहकाला तुम्हाला कमी सर्व्ह करावे लागेल.’  संस्थेने हा आकडा ५ महिन्यांपर्यंत २१०० ग्राहकांच्या २० लाख व्यवहाराच्या आधारावर काढला आहे.

पाच महिन्यांत विक्रीत १५ टक्के वाढ  
या अभ्यासादरम्यान गोड पदार्थांच्या विक्रीत १५.६%, शीतपेयांमध्ये ७.६%, उष्ण पेयांमध्ये ६.७%, शेक्स आणि स्मूदीमध्ये १५% तर स्नॅक्समध्ये ११% वाढ नोंदवण्यात आली. बर्गर ८.६% आणि फ्राइजच्या विक्रीतही ८.२ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...