आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"आधार'शी संलग्न झालेल्यांची संख्या १०० कोटींच्या जवळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवीदिल्ली- देशात "आधार' क्रमांक असणाऱ्यांची संख्या काही दिवसांतच १०० कोटींची अाकडेवारी पार करेल. यामुळे सरकारच्या विविध सामाजिक योजना आधारशी संलग्न करण्याच्या सरकारच्या प्रयत्नाला बळ मिळणार आहे. तसेच योग्य लाभार्थींपर्यंत सबसिडी पोहोचण्यास मदत मिळेल.
आधार क्रमांक म्हणजे प्रत्येक नागरिकाला देण्यात येणारा विशिष्ट नंबर आहे. या योजनेला लागू करण्याचे काम भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) करत आहे.
यूआयडीएआयच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार अातापर्यंत एकूण ९९.९१ कोटी लोकांना आधार क्रमांक देण्यात आला आहे. तरीदेखील ही प्रक्रिया जलद गतीने होत असल्यामुळे हा आकडा अपडेट करण्यात आलेला नसून हे पोर्टल लवकरच अपडेट करण्यात येणार आहे.

सोमवारी प्रसाद करतील घोषणा
दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद येत्या सोमवारी आधारची आकडेवारी १०० कोटींच्या वर गेली असल्याची अधिकृत घोषणा करतील. या योजनेला कायदेशीर अधिकार देण्यासाठी त्याचे विधेयक आधीच संसदेत मंजूर करण्यात आले आहे. आधार क्रमांकाचा वापर सबसिडी आणि समाजकल्याणाच्या विविध योजनांत करता यावा यासाठी सरकारला यूआयडी योजनेअंतर्गत आधार नंबर लवकरात लवकर पूर्ण करायचे आहेत. यामुळे सरकारी योजनांचा योग्य लाभ लाभार्थींपर्यंत पोहोचवण्यास मदत मिळेल.