आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10,000 Rupees To 1 Billion, Journey Of Sachin & Binny Bansal\'s Flipkart

देशातील टॉप-100 श्रीमंतांमध्ये 2 मित्रांचा समावेश, कंपनीत आहेत 33000 कर्मचारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिन आणि बिन्नी - Divya Marathi
सचिन आणि बिन्नी
यूझर्सला एखादी ऑनलाइन वस्‍तू खरेदी करायची असेल तर ते आधी Flipkart, स्नॅपडील, अॅमेझोन वेबसाइट पाहातात. या साईटवर युझर्सला त्‍यांच्‍या बजेटमध्‍ये वस्‍तू मिळतात. यूझर्सच्‍या या विश्‍वासामुळे Flipkart चे संस्‍थापक सचिन बंसल आणि बिन्नी बंसल यांचा फोर्ब्सच्‍या श्रीमंत भारतीयांच्‍या यादीमध्‍ये समावेश झाला आहे. त्‍यांनी केवळ 10 हजार रूपयांपासून Flipkart ची सुरूवात केली होती. ते आता 6100 कोटी रूपयांचे झाले आहे.
सचिन आणि बिन्नी यांची नेटवर्थ 8,580 कोटी रूपयांची आहे. यादीमध्‍ये एकूण 100 नाव आहेत. यात सचिन आणि बिन्नी 86 क्रमांकावर आहेत. या यादीमध्‍ये ई- कॉमर्स संस्‍थापकांचा पहिल्‍यांदा समावेश झाला आहे.
10 हजार रूपयांत सुरू केले होते Flipkart
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली येथे शिक्षण घेऊन सचिन आणि बिन्नी यांनी ऑक्‍टोबर 2007 मध्‍ये Flipkart ची सुरूवात केली. सुरूवातीला याचे नाव फ्लिपकार्ट ऑनलाइन सर्व्हिसेस प्रायव्‍हेट लिमिटेड होते. सचिन आणि बिन्नी सुरूवातीला बुक्‍स सेलिंगचे काम करत होते. Flipkart सुरू करण्‍याआधी त्‍यांनी अॅमेझोन डॉट कॉममध्‍ये काम केले. त्‍यानंतर दोघांनी मिळून 10 हजार रूपयांपासून Flipkart सुरू केले. जे आज 6100 कोटी रूपयांपर्यंत पोचले आहे. यात 33 हजारांपेक्षा आधिक कर्मचारी आहेत.
पुढील स्‍लाइडवर वाचा सचिन आणि बिन्नी यांचा प्रवास...