आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

११ पेमेंट बँकांना तत्त्वत: मान्यता, रिलायन्स, आदित्य बिर्ला, व्होडाफोन, एअरटेलला परवानगी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेने ११ कंपन्यांना पेमेंट बँक सुरू करण्यासाठी तत्त्वत: मान्यता दिली आहे. यांना बँकिंग व्यवसाय सुरू करण्याची परवानगी नंतर दिली जाणार आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, आदित्य बिर्ला नुवो, व्होडाफोन आणि एअरटेल यांचा समावेश आहे.
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या निर्णयाचे स्वागत करत, यामुळे बँकिंग क्षेत्रात जास्त पैसा येण्यास मदत मिळण्याची आशा व्यक्त केली आहे. एसबीआयसह अनेक मोठ्या बँका ग्रामीण भागात विस्तार करण्यास इच्छुक असून आता या पेमेंट बँका मोठ्या बँकांना मदत करतील, असेही मत जेटली यांनी व्यक्त केले.

रिझर्व्ह बँकेने ज्या कंपन्यांना पेमेंट बँकांना तत्त्वत: परवानगी दिली आहे, त्यामध्ये डाक विभाग, चोलामंडलम डिस्ट्रीब्युशन सर्व्हिसेस, टेक महिंद्रा, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल), फिनो पेटेक, सन फार्माची दिलीप शांतीलाल सिंघवी आणि पे-टीएमचे विजय शेखर शर्मा यांचा समावेश आहे.

ही तत्त्वत: मान्यता १८ महिन्यांसाठी वैध धरली जाणार आहे. या दरम्यान कंपन्यांना रिझर्व्ह बँकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या दिशानिर्देश आणि वेळोवेळी तयार करण्यात आलेल्या अटींचे पालन करावे लागणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या वतीने बुधवारी याबाबतची माहिती जाहीर करण्यात आली. या पेमेंट बँकेचा वापर एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी पैसा पाठवण्यासाठी हाईल.
पेमेंट बँक म्हणजे काय?
ही बँकेची एक वेगळी श्रेणी आहे. ज्या बँका जमा करू शकतात, मात्र कोणत्याही व्यक्तीच्या खात्यात एक लाख रुपयांपेक्षा जास्त असणार नाही. एनआरआय या बँकेत खाते उघडू शकत नाही. एटीएम किंवा डेबिट कार्ड देता येईल, मात्र क्रेडिट कार्ड देता येणार नाही. या बँकांना कोणालाही कर्ज देण्याची परवानगी नसते.
कामाला मान्यता
ही रिझर्व्ह बँकेने दिलेली तत्त्वत: मंजुरी म्हणजे आमच्या आजपर्यंतच्या कामाला मान्यता देण्यासारखे आहे. पेमेंट बँकेच्या रूपात काम करण्यासाठी पेटीएमला कोणत्याही अतिरिक्त निधीची आवश्यकता भासणार नाही. कंपनीकडे यासाठी आवश्यक असलेला पैसा उपलब्ध आहे. विजय शेखर शर्मा, संस्थापक, पे-टीएम