आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्यक्ष 15 टक्के, तर अप्रत्यक्ष करसंकलनात 26 टक्के वाढ, आठ महिन्यांत वर्षभरातील उद्दिष्टाच्या 59% संकलन पूर्ण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चालू आर्थिक वर्षातील पहिल्या आठ महिन्यांत एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान प्रत्यक्ष करसंकलनात ४.१२ लाख कोटी रुपये, तर अप्रत्यक्ष करसंकलनापोटी ५.५२ लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. गेल्या वर्षी या समान कालावधीची तुलना केल्यास यामध्ये अनुक्रमे १५.१२ टक्के आणि २६.२ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. एकूण करसंकलन ९.६४ लाख कोटी

झाले असून पूर्ण वर्षभराच्या १६.२६ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत हा अाकडा ५९ टक्के आहे.
सरकारने २०१६-१७ मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १२.६४ टक्के जास्त म्हणजेच ८.४७ लाख कोटी रुपये प्रत्यक्ष करसंकलनाचे उद्दिष्ट निश्चित केले होते. अप्रत्यक्ष करसंकलनाचे उद्दिष्ट १०.८ टक्के जास्त, ७.७९ लाख कोटी रुपये ठेवण्यात आले हाेते.

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) च्या आकडेवारीनुसार नोव्हेंबरपर्यंत एकूण प्रत्यक्ष करसंकलन चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या ४८.६७ टक्के झाले आहे. यादरम्यान व्यावसायिक करात ११.२२ टक्के आणि सिक्युरिटी ट्रांझेक्शन करांसह वैयक्तिक प्राप्तिकरातून २२.४१ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. यादरम्यान एकूण १,०५,५६१ कोटी रुपयांच्या परताव्यानंतर वाढ अनुक्रमे ८.७५ टक्के आणि २३.८९ टक्के झाली.

सीबीईसीच्या आकडेवारीनुसार नोव्हेंबरपर्यंतच एकूण अप्रत्यक्ष करसंकलन अर्थसंकल्पीय अंदाजाच्या ७१.४३ टक्के राहिले आहे. केंद्रीय उत्पात शुल्कापोटी गेल्या वेळी २.४३ लाख कोटी रुपये आले, तर त्याच्या आधीच्या वर्षी या समान कालावधीत १.६९ लाख कोटी रुपये आले होते. यामध्ये ४३.५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. सेवा कर संकलन १.६० लाख कोटी रुपये झाले असून गेल्या वर्षी समान कालावधीत जमा रकमेच्या तुलनेत हा आकडा २५.७ टक्के जास्त आहे. सीमा शुल्कात यादरम्यान १.४८ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला असून वर्ष २०१५-१६ मध्ये याच समान कालावधीतील रकमेची तुलना केल्यास हा अाकडा ५.६ टक्के जास्त आहे.
बातम्या आणखी आहेत...