आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकिंग सेक्टर, म्युच्युअल फंड आणि इन्शुरन्स कंपन्यांच्या विस्तारामुळे २०१७ मध्ये, २. ५ लाख नोकऱ्या मिळण्याची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँकिंग क्षेत्र दीर्घकाळापासून युवकांचे आवडीचे क्षेत्र राहिलेले आहे. गेल्या काही वर्षांत म्युच्युअल फंड आणि विमा कंपन्यांतही युवकांची रुची आवड वाढत आहे आणि फायनान्सशी संबंधित कोर्सदेखील चलनात आले आहेत. अशातच नव्या वर्षात या उद्योगात जॉबसाठी नव्या संधी असतील. बँकांची ग्रामीण क्षेत्रापर्यंतची वाढती पोहोच आणि फायनान्शियल एजन्सीजशी संबंधित ग्रामीण क्षेत्रात वाढत्या माहितीमुळे रोजगार नोकऱ्या वाढल्या आहेत. 

केपीएमजीच्या अहवालानुसार भारताची बँकिंग आणि फायनान्शियल उद्योग जगत २०२० पर्यंत जगातील पाचवा आणि २०२५ पर्यंत तिसरा सर्वात मोठा बँकिंग उद्योग असेल. देशात वर्तमानात २६ सार्वजनिक क्षेत्रातील बँका, २५ खासगी क्षेत्रातील बँका, ४३ परदेशी बँका, ५६ प्रादेशिक ग्रामीण बँका, १५८९ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँका आणि ९३ हजार ५५० रुरल को-ऑपरेटिव्ह बँका आहेत. देशात बँकिंग उद्योगात पब्लिक बँकांची जवळपास ८० टक्के भागीदारी आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडियानुसार देशातील म्युच्युअल फंड उद्योग जवळपास २१० अब्ज डॉलरचा झाला आहे. विकासाच्या या शक्यतांमुळे रोजगाराच्या संधीही निर्माण होतील. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अहवालानुसार २०१७ पर्यंत देशातील बँकिंग अँड फायनान्शियल उद्योगात २ लाख ४५ हजार नव्या नोकऱ्या निर्माण होतील.  

विविध बँकांमध्ये ठेवी २०११ ते २०१५ दरम्यान ६ टक्के वार्षिक दराने वाढत आहेत. यादरम्यान देशात एटीएमच्या संख्येत मोठी वाढ दिसली. २०१२ मध्ये देशात प्रत्येक १० लाख लोकांत १०५ एटीएम होते, जे २०१७ मध्ये प्रत्येक १० लाखात ३०० झाले. तेच देशातील म्युच्युअल फंड उद्योग २००७ पासून २०१६ दरम्यान १२. ८ टक्के दराने वाढतो आहे. देशातील लाइफ इन्शुरन्स मार्केट २००२ ते २०१६ दरम्यान १३. १० टक्के वार्षिक दराने वाढते आहे. बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिस करिअरमध्ये बँकिंग आणि पैशाशी संबंधित मॅनेजमेंट सेवेसारख्या सेव्हिंग, इन्व्हेस्टिंग आणि रिटायरमेंट प्लॅन आदी यात समाविष्ट आहेत. या क्षेत्रात ग्राहक सेवा बँकिंगपासून ते सेल्स पोझिशन, फायनान्शियल अॅडव्हायझर आणि अॅनालिस्ट पोझिशनपर्यंत करिअरच्या शक्यता आहेत.

फायनान्शियल एजन्सी, बँकांमधील संधी  
विद्यार्थी व्यावसायिक बँका, मॉर्गेज कंपन्या, सेव्हिंग व लोन एस्टाब्लिशमेंट आणि क्रेडिट असो., सरकारी एजन्सीज आणि कंपन्यांमध्ये नोकरी करू शकतात. फायनान्शियल मॅनेजरदेखील काम करू शकतात. याशिवाय अकाउंट सेवा, बँक अँड लोन सर्व्हिस ऑर्गनायझेशनमध्ये काम करू शकतात. यासह विमा कंपन्या, म्युच्युअल फंड ऑर्गनायझेशन आणि पेन्शन व सिक्युरिटी फर्ममध्येही नोकरी करू शकतात. 

१५ हजारांपासून ५० हजार रुपयांपर्यंत असू शकते प्रतिमहाचे पॅकेज 
या क्षेत्रात फ्रेशरला संस्थेनुसार पॅकेज मिळण्याची शक्यता असते. बँकिंग एक्झिक्युटिव्ह पदांमध्ये फ्रेशरला १५ ते २० हजार रुपये प्रतिमाह पॅकेज मिळू शकते. उच्च पदव्यांच्या फायनान्शियल कंपन्यांमध्ये सरासरी मासिक पॅकेज २० ते २५ हजार रुपये वार्षिक मिळण्याची शक्यता असते. तथापि काही संस्थांमध्ये पॅकेज ५० हजार रुपये प्रतिमाहदेखील असू शकते. 

बिझनेस आणि फायनान्सशी संबंधित पदवी वा पदविका आवश्यक 
या क्षेत्रात अधिकतर जॉबसाठी बिझनेस आणि फायनान्सशी संबंधित पदवी वा पदविका आवश्यक असते. बॅचलर आॅफ कॉमर्स, बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन, एमबीए फायनान्ससारखा कोर्स करणारे विद्यार्थी या क्षेत्रात करिअर बनवू शकतात. देशातील काही प्रमुख शिक्षणसंस्था बँकिंग आणि फायनान्सची पदविकादेखील करतात. बँकिंगशी संबंधित सरकारी नोकऱ्यांसाठी आयबीपीएस आणि अन्य परीक्षा आयोजित केल्या जातात. यांच्या माध्यमातून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये नोकऱ्या करू शकतात.
बातम्या आणखी आहेत...