आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुष उद्योगात तीन वर्षांत 2.60 कोटी राेजगार :वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आयुष उद्याेगात दोन आकडी विकास साध्य करण्याची क्षमता आहे. येत्या तीन वर्षांत म्हणजे २०२० पर्यंत २.६० कोटी लोकांना हा उद्योग रोजगार देऊ शकतो. यामध्ये १० लाख जणांना प्रत्यक्ष व २.५० कोटी जणांना अप्रत्यक्ष रोजगार देण्याची क्षमता आहे. वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी सोमवारी येथे हे मत व्यक्त केले. अायुषवरील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद “आरोग्य २०१७’चे आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासोबत केलेल्या उद्््घाटनानंतर प्रभू बोलत होते. या दोन दिवसांच्या परिषदेत भारतासह जगातील ६० देशांचे जवळपास १५०० प्रतिनिधी भाग घेत अाहेत. आयुष चिकित्सा व आरोग्य देखभालीची एक पारंपरिक पद्धती असून त्यात आयुर्वेद, योग व नैसर्गिक चिकित्सा, युनानी, सिद्धा व होमिओपॅथी यांचा समावेश आहे.  


प्रभू म्हणाले, सरकार २०२२ पर्यंत आयुष क्षेत्राचा आकार तीनपट वाढेल. आयुषची देशांतर्गत बाजारपेठ ५०० कोटी रुपये होण्याचा अंदाज आहे. याची निर्यात २०० कोटी रुपये आहे. स्टार्टअप सुरू करणाऱ्या युवा उद्योजकांसाठी या आरोग्य क्षेत्रात बरीच जास्त शक्यता आहे. सरकारने आयुषमध्ये १०० टक्के प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीची(एफडीआय) परवानगी दिली आहे. या क्षेत्रातील व्यापक शक्यतांसाठी संबंधित पक्षांच्या साधनांबाबत एका मंचावर येण्याची आवश्यकता प्रभू यांनी व्यक्त केली.  

बातम्या आणखी आहेत...