आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2020 पर्यंत मिळतील 2 कोटी लोकांना नोकऱ्या, दरवर्षी 7.5 टक्के वाढते आहे देशाचे रिटेल क्षेत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिजनेस डेस्‍क - माहिती, संपर्क व मनोरंजनाच्या काळात खरेदी लोकांची हौस होत आहे. शहरातील मॉल संस्कृती व रिटेल स्टोअरची संख्या वाढण्याचे कारण खरेदीप्रति लोकांच्या दृष्टिकोनात बदल झाला. सध्याच्या काळात लहान वस्त्यांतही रिटेल स्टोअरची संख्या वाढतेय.
 
रिटेल उद्योगाच्या गेल्या काही वर्षांत वेगाने वाढण्याचेही मोठे योगदान राहिले आहे. भारतच नव्हे तर जगभरात रिटेल उद्योग हा सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या उद्योगांपैकी एक आहे. अनुमानानुसार देशातील रिटेल उद्योगात ४ कोटी लोकांना रोजगार मिळाला. २०२० च्या अखेर ही संख्या वाढून ६ कोटी होऊ शकते.  
 
जीडीपीत आहे १० टक्के वाटा  
अहवालानुसार देशाच्या विकासदरात रिटेल उद्योगाचा १० टक्के व रोजगारात ८ टक्के वाटा आहे. देशातील रिटेल उद्योगात २०१५ मध्ये ६०० अब्ज डॉलरचा व्यवसाय होता. तो २०२० मध्ये वाढून १ ट्रिलियन (खर्व) डॉलर होण्याची शक्यता आहे. रिटेल उद्याेगाच्या वेगाने विस्तारण्यात ई-कॉमर्सची महत्त्वाची भूमिका आहे. अहवालानुसार देशाचा बिझनेस टु बिझनेस ई-कॉमर्स बाजार २०२० पर्यंत ७०० अब्ज डॉलरचा होईल. देशात बनलेल्या रिटेल उत्पादनांच्या निर्यातीत काही वर्षांत वेगाने वाढा झाली. घरगुती उत्पादनांची निर्यात २०१३ पासून २०१६ च्या दरम्यान १० टक्के वार्षिक दराने वाढते आहे. रिटेल क्षेत्राच्या विस्ताराने रोजगाराच्या शक्यता वाढल्या आहेत आणि हा युवकांसाठी रोजगाराचा एक नवा मार्ग होऊ शकतो.  
 
संपर्क-संवाद कौशल्य महत्त्वाचे  
या उद्योगात रिटेल व्यवस्थापन व्यावसायिकांसाठी रोजगाराच्या उत्तम संधी आहेत. यात विविध पदे, कार्यक्षेत्रात नोकरी करू शकतात. उदा. रिटेल बिझनेसमध्ये ग्राहक सेल्स असोसिएट एंट्री लेव्हल पोस्ट आहे. पण रिटेलचा व्यवसाय -बिझनेस हा विक्री-सेल्सवरच आधारित असतो, यासाठी हे पदही महत्त्वपूर्ण असते. विभाग मॅनेजर, फ्लोअर मॅनेजर, कॅटेगरी मॅनेजर, स्टोअर मॅनेजर, रिटेल ऑपरेशन मॅनेजर, रिटेल बायर्स अँड मर्केंडायझर व अन्य पदांसाठीही नोकरीच्या संधी आहेत. काही तर अशीही कामे आहेत, ज्यांच्यासाठी एखाद्या विशेष पदवी वा कौशल्याची गरज नसते. सामान्य पदवीधर व त्याहीपेक्षा कमी योग्यतेचेही नोकरी करू शकतात. यासाठी चांगले संवाद कौशल्य आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसारख्या बेसिक स्किलची गरज असते.   

कुठल्याही शाखेचे घ्या प्रवेश  
या क्षेत्रात करिअर बनवण्यासाठी १२ वीमध्ये  विषयाची अनिवार्यता नसते व सर्व शाखांचे विद्यार्थी याच्याशी संबंधित कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकतात. विद्यार्थी फॅशन मर्केंडायझिंग अँड रिटेल मॅनेजमेंटच्या पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात. तेच पदवी पूर्ण केलेले विद्यार्थी रिटेल मॅनेजमेंटच्या एमबीए कोर्सला प्रवेश घेऊ शकतात. याशिवाय देशभरातील विभिन्न संस्थांमध्ये रिटेल मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र कोर्स केले जातात.  
 
रिटेल स्टोअरमध्ये नोकरीच्या संधी  
या क्षेत्रातील नोकरीत अधिकांश संधी या खासगी क्षेत्रातच उपलब्ध आहेत. यात व्यवसाय विविध शहरांतील सध्याच्या रिटेल स्टोअर वा मॉलमध्ये उपस्थित स्टोअर आणि मूव्ही थिएटरमध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह, सेल्स मॅनेजर, मार्केटिंग मॅनेजर, कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह जॉब करू शकता. मोठ्या शहरातील मॉल कल्चरच्या विस्ताराने नोकरीच्या संधी वाढल्या आहेत.  
 
२-३ लाख रुपयांचे प्रारंभिक पॅकेज  
प्रारंभी व्यावसायिकांना २ ते ३ लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळू शकते. तथापि, संस्था आणि पदानुसार वेतन वेगवेगळे असू शकते. काही वर्षांच्या अनुभवानंतर सरासरी व्यावसायिकास ५ ते ६ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळण्याची शक्यता असते. मोठ्या पदांवर हे पॅकेज  अधिक असू शकते.  
 
बातम्या आणखी आहेत...