आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात 200 कोटी आयओटी डिव्हाइस; रविशंकर प्रसाद यांचे मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशात येत्या ३-४ वर्षांत इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) डिव्हाइस दहापटीने वाढत २०० कोटी हाेतील, अशी आशा माहिती तंंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केली. भारतीयांचा तंत्रज्ञानाकडे वाढणारा वाढता ओढा पाहता ही वाढ होणार आहे. इंटरनेटने नियंत्रित करता येऊ शकणारे कोणतेही उत्पादन अथवा उपकरण आयओटीअंतर्गत येते. नव्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले पाहिजे आणि त्याचा पुरेपूर वापर व्हावयास हवा, अशी अपेक्षा रविशंकर प्रसाद यांनी असोचेम आयोजित आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान परिषदेत व्यक्त केली.  प्रसाद म्हणाले, सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना केली आहे. सायबर सेक्युरिटीपासून ब्लॉकचेनपर्यंतच्या तंत्रज्ञानासाठी नवीन केंद्राचा प्रस्ताव आहे. सरकार ५-७ वर्षांत डिजिटल इकॉनॉमी १ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नात आहे. आयओटी, मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सेक्युरिटी विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील.

बातम्या आणखी आहेत...