आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षभरात योग इंडस्ट्री 50%, प्रशिक्षक 40%, योग करणारे 35 टक्क्यांनी वाढले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२१ जून रोजी द्वितीय आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. भारताच्या पुढाकाराने मागच्या वर्षी याची सुरुवात झाली. वर्षभरात योगाचा व्यवसाय किती बदलला, याचा शोध घेत "दिव्य मराठी'ने आकडेवारी गोळा करून आयुष मंत्रालयाकडून पडताळणी केली. यातील निष्कर्ष धक्कादायक असून वर्षभरात योगाचे रूपांतर वटवृक्षात झाले आहे.

मेक इन इंडियावर आधारित सरकारी दस्तऐवजानुसार देशातील योग व आयुर्वेदाशी संबंधित उत्पादनांचा बाजार १२० अब्जांवर पोहोचला आहे. वर्षभरातच योग इंडस्ट्री ५० टक्के, प्रशिक्षक ४० टक्के व योग करणाऱ्यांची संख्या ३५ टक्क्यांनी वाढली आहे. योग प्रशिक्षकांची मागणी ३५ टक्क्यांनी वाढल्याचे असोचेमने म्हटले आहे. यामुळे आयुर्वेद रिसॉर्ट, हॉलिडे शिबिर, कॉर्पोरेट प्रशिक्षण आदींच्या रूपात अब्जावधींची उलाढाल होत आहे. योग कपड्यांचाच व्यवसाय एक हजार कोटींवर पोहोचला आहे. त्यामुळेच प्रयोग, भूसत्त्व, फॉरएव्हर योग, अर्बन योगसारख्या नव्या कंपन्या योगाशी संबंधित कपडे बनवण्याच्या स्पर्धेत उतरल्या आहेत. २ वर्षांत ती दुप्पट होऊ शकते. चटई, पादत्राणे, डीव्हीडी, स्टुडिओ इत्यादींची मागणी वाढली आहे. ई-कॉमर्स कंपन्यांनी स्पेशल योग थीम स्टोअर सादर केले आहेत.

आयुष मंत्रालयाचे संयुक्त सचिव ए. के. गनेरीवाला "दिव्य मराठी'शी बोलताना म्हणाले की, वर्षभरात अमेरिका, चीन व युरोपमध्येही योग करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यासाठी भारतातून योग प्रशिक्षक मागवले जात असून त्या देशांतील लोकही भारतात येत आहेत. योग अभ्यासक्रम शिकायला येणाऱ्यांना सरकार आता वेगळ्या श्रेणीत व्हिसा देण्याची तयारी करत आहे. गनेरीवाला यांच्या मते, अांतरराष्ट्रीय योग दिनानंतर या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली असून आम्ही याचा मेक इन इंडियासाठी फायदा करून घेण्याच्या तयारीत आहोत. यंदाच्या योग दिनाला सरकारने खादीची किट सादर केली आहे. करिअरच्या बाबतीत यात १०० टक्के लाभच दिसत आहे. ५० विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये पदवी, पदव्युत्तर, प्रमाणपत्र आदी अभ्यासक्रम सुरू आहेत. योग विभागाची स्थापना करण्याचे आदेश आम्ही सर्व विद्यापीठांना दिले आहेत. आम्ही क्वालिटी ऑफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षणार्थींसाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला. १४ लाख शाळांमध्येही योग सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या मते, जगभरातील सुमारे ५ कोटी ३७ लाख कोटींची या क्षेत्रात उलाढाल आहे. एकट्या अमेरिकेतच ६९ हजार कोटी रुपये योगासंबंधी पुस्तके, प्रशिक्षण, वस्त्र व अन्य साधनांवर खर्च होतात. अमेरिकेतील ३ कोटी ५ लाख लोक नियमित योग करतात. फ्लिपकार्टच्या वरिष्ठ मार्केटिंग प्रमुखांच्या मते, योगासाठी वापरल्या जाणाऱ्या चटईची मागणी वर्षभरात ८० टक्क्यांनी वाढली असून कपड्यांत ४० ते ५० टक्क्यांचा फायदा झाला आहे. कंपन्यांसोबतच योगगुरूंनाही प्रचंड लाभ झाला आहे. बाबा रामदेव यांचा पतंजली ब्रँड २ हजार कोटींवर पोहोचला असून वर्षभरात हा व्यवसाय ५ हजार कोटींवर पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे. दरम्यान, चीनमध्ये रामदेव म्हणून प्रसिद्ध मोहन भंडारी यांच्या योगाच्या चीनमधील सेंट्रल टेलिव्हिजनने ५२ डीव्हीडी बनवल्या आहेत. जगभरात यांची विक्री सुरू आहे. जपानच्या हिकारो होशिमोतो यांची जपानमध्ये ७०० योग केंद्रे सुरू आहेत. तर, ११ वर्षे बिझनेस कन्सल्टंट म्हणून काम करणाऱ्या भाविणी कलण आता पूर्णपणे योग क्षेत्रात कार्यरत झाल्या आहेत. डिझायनर कपडे, पादत्राणे, चष्मा, महागडे मोबाइल आणि लॅपटॉपचे लेटेस्ट मॉडेल कलण यांची ओळख आहे. त्या महिन्यातून आठवडाभर अमेरिका, आठवडाभर आफ्रिका आणि युरोप आणि उर्वरित दिवस भारतात राहतात. त्यांना विशेष योग प्रशिक्षक म्हणून अनेक देशांच्या योग स्टुडिओमध्ये बोलावले जाते. यातून दरमहा त्या ३ ते ४ लाख रुपयांची कमाई करतात.

योगशिक्षितांच्या संख्येत दरवर्षी ३०-४० टक्के वाढ
योगाने उद्योगाचे रूप धारण केले आहे. त्यामुळे देशातील योग व्यवसायाने फक्त ८ वर्षांतच ४५ टक्क्यांच्या वाढीसह अडीच लाख कोटींचा आकडा पार केला आहे. जगभरात सुमारे २० कोटी लोक योग करतात आणि त्यातील निम्मे भारतीय आहेत. देशात योग शिकणाऱ्यांची संख्या वार्षिक ३०-४० टक्क्यांनी वाढत आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, योगामुळे देशात आणि देशाबाहेर आणखी काय+काय बदल घडले...
बातम्या आणखी आहेत...