आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेबीने ब्रोकर शुल्कात केली 25 टक्के कपात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रोफाइल फोटो - Divya Marathi
प्रोफाइल फोटो
जयपूर - डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी बाजार नियामक सेबीने शनिवारी जयपूरमध्ये आयोजित बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. याअंतर्गत एक कोटी रुपयांपर्यंतच्या व्यवहारावरील ब्रोकर शुल्कात २५ टक्क्यांची कपात करून १५ रुपये प्रति ट्रान्झॅक्शन करण्यात आले आहे. आतापर्यंत यासाठी २० रुपये शुल्क लागत होते. विविध बाजार इंटरमीडिअरीजकडून वसुली  होणारे इतर शुल्क समान करण्यासाठी सेबीच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.   

सेबीच्या बैठकीत सर्व व्यवहार डिजिटल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे व्यवहार अधिक सोपे आणि तेजीने होतील, तर व्यवहार फेल होण्याच्या प्रकरणातही घट होईल. याव्यतिरिक्त मंडळाने काही नवीन शुल्क लावण्याच्या प्रस्तावालादेखील मंजुरी दिली आहे.  
म्युच्युअल फंड जाहिरातीत परताव्याची माहिती  : सेबीने म्युच्युअल फंड योजनांच्या प्रदर्शनासंबंधी नियमातही बदल केले आहेत. आता म्युच्युअल फंडांना आपल्या जाहिरातीमध्ये गेल्या वर्षभरातील, तीन वर्षांतील, पाच वर्षांतील तसेच योजना आणल्यापासून आतापर्यंतच्या सीएजीआर परताव्याची माहिती द्यावी लागणार आहे. तसेच गेल्या तिमाहीतील शेवटच्या तारखेतील आकडेवारीऐवजी गेल्या महिन्यातील शेवटच्या तारखेपर्यंतची आकडेवारी द्यावी लागणार आहे.