आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 28 Percent Increase Compared To Last Year's Purchase Of Rice

हंगामातील तांदूळ खरेदीत गेल्या वर्षीच्या तुलनेत २८% वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सरकारच्या वतीने चालू हंगामातील तांदूळ खरेदी एक ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली आहे. यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत २८ टक्के जास्त तांदळाची खरेदी झाली आहे. सरकारी एजन्सींच्या वतीने या वर्षी आतापर्यंत १.८९ कोटी टन तांदळाची खरेदी केली असल्याची माहिती सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीत समोर आली आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने १.४८ कोटी टन तांदळाची खरेदी केली होती.

सरकारी संस्थांच्या वतीने हरियाणा, पंजाब आणि छत्तीसगडमध्ये तांदळाची खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात आल्यामुळेच यामध्ये वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी हरियाणामध्ये ४१.६ टक्के जास्तीचा तांदूळ खरेदी करण्यात अाला. पंजाबमध्ये २०.१ टक्के तर छत्तीसगडमध्ये ४१.८ टक्के जास्त तांदळाची खरेदी झाली. त्याचबरोबर सरकारच्या वतीने झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये तांदळाची खरेदी सुरू करण्यात आली आहे.

तसे पाहिले तर या राज्यांमध्ये आतापर्यंत खरेदी करण्यात आलेल्या तांदळाचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. पश्चिम बंगालमध्ये चालू हंगामात आतापर्यंत ८२४५३ टन तांदळाची खरेदी झाली आहे. झारखंडमध्ये गेल्या वर्षी ५७६८ टनांच्या तुलनेत आतापर्यंत फक्त १११० टन तांदळाची खरेदी झाली आहे.

जास्त खरेदी
सरकारच्या वतीने चालू हंगामात तीन कोटी टन तांदूळ खरेदीचे उद्दिष्ट ठरवण्यात आले होते. मात्र, सध्या ज्या गतीने तांदूळ खरेदी सुरू आहे ती पाहता उद्दिष्टापेक्षा जास्त तांदूळ खरेदी होण्याची अपेक्षा खाद्य सचिव वृंदा सरूप यांनी व्यक्त केली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत सरकारी संस्थांच्या वतीने २.८ कोटी टन तांदूळ खरेदी झाली होती.