आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

... तर विमानात तुम्हाला नो एंट्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विमान प्रवासादरम्यान प्रवासी कर्मचाऱ्यांशी चुकीचे बोलतांना अथवा वागतांना आढळल्यास मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेता केंद्रीय नागरी उड्ड्यण मंत्रालयाने नो फ्लाईट लिस्ट जाहिर केली. ही यादी जाहिर करतांना केंद्रीय मंत्री अशोक गजपती राजू यांनी सांगितले, की नो फ्लाईट लिस्टला तीन श्रेणीमध्ये विभागण्यात आले आहे. विमानात एखादा प्रवासी चुकीची वर्तवणूक करतांना आढल्यास त्याच्यावर विमानात प्रवास करण्यासाठी आजन्म बंदी येऊ शकते. 
 
- नो फ्लाईट यादीच्या पहिल्या श्रेणीत बोलण्यातून कोणाशी चुकीची वर्तवणूक केली असेल, तर त्याच्यावर तीन महिन्यांसाठी विमान बंदी होऊ शकते.
- दुसऱ्या श्रेणीत फिजीकल मिस बिहेव्हीयर केल्यास सहा महिन्यांपर्यंत बंदी येऊ शकते.
- तिसऱ्या श्रेणीमध्ये जर एखाद्या प्रवाशाने सहप्रवासी अथवा कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली असेल, तर त्याच्यार किमान दोन वर्षे ते आजन्म विमान प्रवास बंदीची नामुष्की येऊ शकते. 
- विमानात प्रवास बंदीच्या विरोधात संबंधीत व्यक्तीला कमिटी अथवा कोर्टात धाव घेता येण्याची मुभा आहे.
 
या कारणाने सुरु झाली नो फ्लाईट लिस्ट
 
शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यासमवेत चुकीची वर्तवणूक केली होती. त्यानंतर देशांतर्गत विमानात प्रवास करण्यास खासदारांना मज्जाव करण्यात आला होता. या खासदारांनी संसदेसमोर माफी मागितल्यानंतर विमान कंपन्यांनी ही बंदी हटविली होती. या प्रकरणापासूनच नो फ्लाईट लिस्ट संदर्भात विचार सुरु झाला होता. 
 
बातम्या आणखी आहेत...