आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोर्ब्जच्या ‘सुपर अचीव्हर्स’ यादीत ३० भारतीय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- फोर्ब्ज मासिकाने विविध २० उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ३० पेक्षा कमी वयाच्या युवकांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये ३० भारतीय वंशाच्या युवकांनी स्थान मिळवले आहे. या यादीत आरोग्य, निर्मिती, खेळ आणि अर्थ यासारख्या २० व्यावसायिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल करणाऱ्या ६०० युवकांचा समावेश करण्यात आला आहे. जग बदलण्याची इच्छा असणारे हे ६०० युवक असल्याचे फोर्ब्जने त्यांचा गौरव करताना म्हटले आहे.
   
“नियोलाइट’चे सहसंस्थापक २७ वर्षीय विवेक कोप्पार्थी यांनी फोटोथेरपीसाठी एक मशीन विकसित केली आहे. याचा वापर कावीळ झालेले रुग्ण घरी बसून करू शकतील. त्यांची कंपनी मुलांना होणाऱ्या हायपोथर्मियासारख्या आजारावरदेखील उपकरण बनवत आहे. 

रवांडामध्ये ड्रोनने औषधीचा पुरवठा   
विकसनशील देशांतील नागरिकांना ड्रोनच्या माध्यमाने आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी २७ वर्षीय प्रार्थना देसाईने हार्वर्ड विद्यापीठातील शिक्षण सोडले. त्यांची हेल्थ केअर कंपनी जिपलाइन रवांडामध्ये ड्रोनच्या माध्यमातून गरजू रुग्णांसाठी औषधी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. 

भावाच्या आजारपणामुळे बनवले डिव्हाइस   
एव्हेरिया हेल्थ सोल्युशन्सचे संस्थापक रोहन सुरी १७ वर्षांचा आहे. रोहनच्या भावाचा आजार सुरुवातीला समजलाच नसल्याने रोहनने ब्रेन हॅमरेजची तपासणी करण्यासाठी डिव्हाइस विकसित केले असल्याचे फोर्ब्जने म्हटले आहे. फोर्ब्जच्या मते रोहनने ६० रुग्णांची तपासणी केली आहे.
 
 
बातम्या आणखी आहेत...