Home | Business | Business Special | 30 thousand crores online shopping possible during festive season

सणांत ऑनलाइन शॉपिंगचा अंदाज 30 हजार कोटींचा, मोबाइल आणि गॅजेट्सची सर्वाधिक खरेदी

वृत्तसंस्था | Update - Oct 12, 2017, 12:14 AM IST

या वेळी सणासुदीच्या दिवसात लोक ३०,००० कोटी रुपयांची शॉपिंग करू शकतात, असा अंदाज उद्योग संघटना असोचेमने व्यक्त केला आहे.

  • 30 thousand crores online shopping possible during festive season
    नवी दिल्ली - या वेळी सणासुदीच्या दिवसात लोक ३०,००० कोटी रुपयांची शॉपिंग करू शकतात, असा अंदाज उद्योग संघटना असोचेमने व्यक्त केला आहे. तेजीने चालणारे इंटरनेट सर्वदूर पसरल्यामुळे छोट्या शहरातूनही ऑनलाइन शॉपिंगची मागणी वाढली असल्याचे मत असोचेमच्या अहवालात व्यक्त करण्यात आले आहे.
    असोचेमने दिल्ली-एनसीआर, मुंबई, चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद, हैदराबाद, बंगळुरू, चंदिगड आणि डेहराडूनमध्ये केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारावर हा अहवाल जारी केला आहे. या सर्वेक्षणासाठी उत्पादक, रिअल इस्टेट, वाहन, आरोग्य, किरकोळ विक्रेते आणि हॉटेल क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करण्यात आली.
    सणासुदीच्या दिवसात दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूमध्ये सर्वाधिक ऑनलाइन शॉपिंग होत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर पुणे, गुरुग्राम, नोएडा, चंदिगड, नागपूर, इंदूर, कोइंबतूर, जयपूर आणि विशाखापट्टणमसारख्या शहरांतही तेजीने मागणी वाढली आहे. ही वार्षिक वाढ ६० ते ६५ टक्क्यांपर्यंत आहे. सर्वेक्षणानुसार ऑनलाइन सर्व्हे करणाऱ्यांमध्ये ६५ टक्के पुरुष आणि ३५ टक्के महिला आहेत. आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली असून ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांमध्ये वय वर्षी २५ ते ३४ या वर्गातील लोकांची संख्या जास्त आहे. नियमित ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांमध्ये ३५ टक्के लोक १८ ते २५ वर्षे वयाचे आहेत. याव्यतिरिक्त ५५ टक्के लोकांचे वय २६ ते ३५ वर्षे आहे. ३६ ते ४५ वर्षे वयाच्या लोकांची संख्या ८ टक्के, तर ४५ ते ६० वर्षे वयाचे केवळ २ टक्के लोक आहेत.

Trending