आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नव्या पिढीकडे व्यवसाय देण्यास ३५ टक्के तयार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतातील बिझनेसचा मोठा भाग विशिष्ट कुटुंबीयांच्या नियंत्रणात आहे. मात्र, आता ते देखील हळूहळू “प्रोफेशनल’ होत आहेत. फक्त ३५ टक्के कुटुंबीयच नियंत्रणात असलेला सर्व व्यवसाय आपल्या पुढच्या पिढीकडे देण्यास तयार आहे. कन्सल्टन्सी संस्था पीडब्ल्यूसीने “इंडिया फॅमिली बिझनेस सर्व्हे रिपोर्ट’मध्ये हा खुलासा केला आहे.
या अहवालानुसार कुटुंबीयांचे नियंत्रण असलेल्या व्यवसायाबाबत लोकांची धारणा बदलत आहे. २०१४ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षण अहवालात ४० टक्के लोकांनी पुढील पिढीकडे व्यवसाय देण्याची तयारी दाखवली होती. आता ही संख्या ३५ टक्क्यांवर आली आहे. पुढील पिढीकडे व्यवसायाची सूत्रे देण्यासोबतच व्यवस्थापनाला प्रोफेशनल बनवण्याची इच्छा असणाऱ्यांची संख्याही ४८ टक्के आहे. २०१४ मध्ये अशा लोकांची संख्या फक्त ४० टक्के होती. पीडब्ल्यूसी या अहवालात ५० देशांमधील २,८०० कुटुंबीयांच्या नियंत्रणात असलेल्या बिझनेसचा समावेश केला आहे. भारतात देखील १०२ बिझनेसचे सर्वेक्षण करण्यात आले. यातील सुमारे अर्ध्या कंपन्यांनी नवीन क्षेत्रात किंवा नवीन देशात व्यवसाय करण्याची तयारी दाखवली आहे.

खराब परिस्थितीत मजबूत : खराब परिस्थितीतही कुटुंबाच्या नियंत्रणात असलेले व्यवसाय जास्त मजबुतीने उभे राहत असल्याचे या सर्वेक्षण अहवालात समोर आले आहे. कंपन्यांच्या मते नावीन्यपूर्णता, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, टॅलेंट आकर्षित करणे आणि ते कायम ठेवणे, प्रतिस्पर्धी आणि प्रोफेशनलिझ्म ही पुढील पाच वर्षांतील आव्हाने आहेत.
उत्तराधिकारी योजना
- ३१ टक्के वरिष्ठ पदांसाठी उत्तराधिकार योजना बनवली आहे.
- २२ टक्के कंपन्यांनी वरिष्ठ पदांसाठी सक्सेशन योजना बनवली आहे.
- ५० टक्के म्हणाले की, त्यांनी उत्तराधिकारासाठी विशेष्ट योजना बनवलेली नाही.
- १५ टक्के लोकांनी सांगितले की, यासाठी त्यांची सक्सेशन योजना लिखित स्वरुपात तयार आहे.
बातम्या आणखी आहेत...