आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चांगल्या पावसाने कडधान्य पेरणी क्षेत्रात ३६ टक्के वाढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशभरात झालेल्या चांगल्या पावसामुळे खरीप हंगामात पेरणी क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली आहे. यंदाच्या खरिपातील कडधान्य पेरणी विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी झालेल्या एकूण कडधान्य पेरणीपेक्षा यंदाचे पेरणीक्षेत्र वाढून ३० लाख हेक्टरपेक्षा जास्त झाले आहे. यामुळे एकूण खरीप पेरणी क्षेत्राचा विचार केल्यास यंदा पेरणी क्षेत्रात सहा टक्के वाढ झाली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून उत्पादन कमी झाल्यामुळे देशभरात डाळींच्या किमती उच्चांकी पातळीवर पोहोचल्या होत्या. तूरडाळीच्या किमती तर २०० रुपये प्रति किलोपर्यंत गेल्या होत्या. मात्र, यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा आहे. तसेच गेल्या दाेन वर्षांच्या तुलनेत कडधान्य पेरणी क्षेत्रातदेखील वाढ झाली आहे. गेल्या वर्षी पूर्ण खरीप हंगामात १०८ लाख हेक्टरवर कडधान्य पेरणी झाली होती. यंदा मात्र पेरणी क्षेत्रात वाढ होऊन ते १३६.६ लाख हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. गेल्या वर्षी आतापर्यंत १०० लाख हेक्टरच्या जवळपास पेरणी क्षेत्र पोहोचले होते. पेरणी क्षेत्रात वाढ झाल्यामुळे यंदा कडधान्य उत्पादन २०० लाख टनापर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या वेळी १६४.७ लाख टन कडधान्य उत्पादन झाले होते.
बातम्या आणखी आहेत...