आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा वर्षभरात डेटा अॅनालिटिक्स क्षेत्रात 50 हजार कर्मचाऱ्यांची गरज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उद्योग क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे कंपन्या त्यांच्या विस्तारासाठी नवे उपाय शोधत आहेत. याच उपायांपैकी एक म्हणजे डेटा अॅनालिटिक्स. डेटा अॅनालिटिक्सच्या प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर करून उपलब्ध माहितीचे विश्लेषण  केले जाते. या विश्लेषणाच्या आधारावर कंपन्या त्यांचा पुढील निर्णय घेतात. डेटा अॅनालिटिक्सचा उपयोग व्यवसाय वृद्धी, खर्च कमी करणे आणि कामाची पद्धत आधिक चांगली करण्यासाठी केला जातो. 

वेगवेगळ्या क्षेत्रांतील कंपन्या वेगवेगळ्या पद्धतीने डेटा अॅनालिटिक्सचा वापर करतात. उदाहरणार्थ टेलिकॉम सेवा देणाऱ्या कंपन्या याच्या मदतीने वापर आणि शुल्क पद्धत यांचे विश्लेषण करतात.  नुकत्याच आलेल्या एका पाहणी अहवालात पुढील वर्षी देशात डेटा अॅनालिटिक्स संबंधित ५० हजार लोकांची गरज भासणार आहे.  

अहवालात असे सांगितले गेले आहे की, एप्रिल २०१५ ते एप्रिल २०१६ दरम्यान डेटा अॅनालिटिक्सच्या नोकऱ्यंामध्ये ५२ टक्के तर एप्रिल २०१४ ते २०१५ दरम्यान ४० टक्के वाढ झालेली आहे.  डेटा अॅनालिटिक्स क्षेत्रात जगभरात अनेक नोकऱ्यांमध्ये १२ टक्के हिस्सा भारताचा आहे. शहर पातळीवर जर पाहिले गेले तर  डेटा अॅनालिटिक्ससाठी सर्वात जास्त नोकरीच्या संधी बंगळुरू आणि दिल्ली येथे अाहेत.

टक्केवारीच्या दृष्टिकोनातून बघिल्यास बंगळुरूमध्ये २५ टक्के, दिल्लीत २२ टक्के मुंबईत १७ टक्के  आणि अंदाजे ९ टक्के नोकऱ्या हैदराबादेत आहेत. टियर बी प्रकारच्या शहरात डेटा अॅनालिटिक्स नोकरीच्या संधी वाढल्या आहेत. मागील वर्षी ही संधी ५ टक्के होती, आता ती ७ टक्के झाली आहे. उद्योगाच्या हिशेबाने पाहायला गेेल्यास डेटा अॅनालिटिक्सअॅनालिटिक्सच्या सर्वात जास्त नोकऱ्या बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिस, ई-कॉमर्स, फार्मा व हेल्थकेअर, एनर्जी अँड युटिलिटी आणि  मीडिया अँड  एंटरटेनमेंट क्षेत्रात आहेत.

मॅनेजमेंटची प्रक्रिया आणि पॉलिसी रेकॉर्ड डेव्हलप करण्यापासून ते डेटा डॅशबोर्ड तयार करणे आणि परफॉर्मन्स इंडिकेटर तयार करणे हे काम डेटा अॅनालिटिक्सचे असते. यात अॅनालिटिकल प्रॉब्लेम सॉल्विंग स्किलपासून  आउट ऑफ बॉक्स थिंकिंग आणि लॉजिकल सोल्युशन्सपर्यंत पोहोचण्याच्या गुणवत्तेला प्राधान्य दिले जाते.  डेटा मायनिंग टेक्निक्स, ऑपरेशनल मॉडेल्स तयार करण्याची क्षमता, विविध स्त्रोतांतून माहिती विश्लेषण करण्याची ख्ुबी, व्हिज्युअलायजेशन स्किल्सबरोबर प्रमुख प्रवाह समजण्याची क्षमता हवी.

बीई किंवा बीटेकच्या विद्यार्थ्यांसाठी संधी
डेटा अॅनालिटिक्समध्ये गणिती कौशल्याचा जास्त उपयाेग होतो. म्हणून या कौशल्याशी संबंधीत पदवी आवश्यक आहे.  पण काही कामांसाठी मास्टर डिग्री लागतेे. कॉम्प्युटर सायन्स, स्टॅटिस्टिक्सच्या विद्यार्थ्यांसाठी जास्त संधी आहेत.यात ४२ टक्के नोकऱ्या बीई व बीटेकसाठी, २६ टक्के पोस्टग्रॅज्युएटसाठी, तर  १० टक्के एमबीए व पीजीडीएमसाठी असतील. 

विविध उद्योगात नोकऱ्या
डेटा अॅनालिटिक्ससाठी अनेक उद्योगांमध्ये रोजगार उपलब्ध आहेत. बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस, ई-कॉमर्स इंडस्ट्री, फार्मास्युटिकल व हेल्थकेअर, एनर्जी व युटिलिटी, मीडिया अँड एंटरटेनमेंट, टेलिकॉम, रिटेल, ऑटोमोबाइल आणि ट्रॅव्हल अँड हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीत जॉब करू शकता.  
 
१.८-२.५ लाख रु.वार्षिक पॅकेज सुरुवातीला 
डेटा अॅनालिटिक्स क्षेत्रात करिअर सुरू करणाऱ्या प्रोफेशनल्सना सरासरी १५ ते २० हजार रुपयांचे पॅकेज मिळण्याची शक्यता असते. पण इंडस्ट्रीनुसार हे पॅकेज वेगवेगळे असते.  काही वर्षाच्या अनुभवानंतर ४ ते ६ लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळते. उच्च पदांसाठी हे पॅकेज ७ ते ८ लाख वार्षिक असते. बदलत्या इलेक्ट्रॉनिक्स व वाढत्या संगणकीकरणाने हे रोजगार वाढू शकतात,असे या क्षेत्रातील जाणकार म्हणतात.
बातम्या आणखी आहेत...