आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

500 कोटी भांडवलाचे मालक लोकांचे आयुष्य बदलणाऱ्या गोष्टीत लावणार पैसे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- अमेरिकेच्या काही अब्जाधीश कुटुंबीयांचा ‘द इम्पॅक्ट’ नामक समूह असून त्यांनी एक अनोखा करार केला आहे. या करारानुसार ते त्यांच्या तिजोरीतील ५० टक्के वाटा इतरांचे आयुष्य सुधारण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे गुंतवतात.

या ‘द इम्पॅक्ट’ समूहाची संकल्पना उद्योगपती बिल गेट्स आणि वॉरेन बफे यांच्या “द गिव्हिंग प्लेज’ या परोपकारी उपक्रमासारख्याच वाटतात. या समूहातील सर्व सदस्यांना त्यांच्या संपत्तीचा निम्मा भाग चांगल्या कामांसाठी गुंतवावा लागतो. पण ‘द इम्पॅक्ट’ची संकल्पना परोपकार किंवा मदतीशी संबंधित नाही, तर ज्यातून काही बदल दिसतील अशा लोकांच्या जीवनाचा स्तर सुधारणाऱ्या बाबींमध्ये गुंतवणूक करण्याशी आहे. सीईओ अबीगेल नोबेल यांच्या मते, ‘जगभरातील अडचणी परोपकार किंवा विदेशी मदतीने सोडवल्या जाऊ शकत नाहीत. यासाठी आपल्याला उद्योग आणि भांडवली बाजाराचा उपयोग करण्याची गरज आहे. म्हणूनच आम्ही जगातील श्रीमंत तसेच प्रभावशाली अौद्योगिक कुटुंबीयांसोबत काम करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. वडील किंवा आजोबा-पणजोबांकडून परोपकारासाठी सुरू केलेल्या उपक्रमांत गंुतवणूक करून परिवर्तन आणू इच्छिणाऱ्या कुटुंबातील युवकांवर आमचे विशेष लक्ष आहे. ‘चांगल्यासाठी गुंतवणूक’ या संकल्पनेप्रति आम्ही वचनबद्ध आहोत. यात कोणतीही कायदेशीर बंधने नसली तरी नैतिक बंधने खूप आहेत. गुंतवणुकीसाठी किमान मर्यादा नाहीच.’ दरम्यान, ‘इम्पॅक्ट’ ने आजवर गुंतवणुकीचा खुलासा केला नाही. नोबेल सांगतात, ‘या समूहात फक्त निमंत्रणावरूनच सामील होता येते. समूहातील १५ कुटुंबीयांची सरासरी संपत्ती ५०० कोटींपेक्षा जास्त आहे. यातील सदस्य इतरांचे पोर्टफोलिओ पाहू शकतात व अन्य कुटुंबांशी तुलना करू शकतात. त्याआधारे आपली गुंतवणूक अधिक प्रभावी पद्धतीने करू शकतात.’

गुंतवणूकदार जीन केस यांच्या मते, ‘वित्तीय परताव्यावर आधारित असणाऱ्या गुंतवणुकीच्या जुन्या पद्धतीपासून युवा दूर जात आहेत. खासगी भांडवलाचा उपयोग सामान्य लोकांसाठी केला जात असलेल्या गोष्टी ते भांडवलशाहीच्या विविध प्रकारांतून वाढवत आहेत.’

रॉकफेलरचे नातू आणि फोर्डच्या नातींसारख्या युवकांनी बनवला समूह
हा समूह बनवण्याची कल्पना जस्टिन रॉकफेलर आणि टायडेन व्हेंचर्सचे सीईओ कोहेन यांची आहे. अमेरिकन आॅइल क्षेत्रातील गर्भश्रीमंत राहिलेले जॉन डी. रॉकफेलर यांचे नातू जस्टिन हे अॅडेपरमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट डायरेक्टर आणि रिचमंड ग्लोबलमध्ये व्हेंचर पार्टनर आहेत. हयात हॉटेल समूहाच्या लिजल प्रित्झकर, एओएलचे सहसंस्थापक स्टीव्ह केस यांची पत्नी जीन आणि हेन्री फोर्ड यांची नात जेसन इंगले यांचा या समूहाच्या संस्थापक सदस्यांत समावेश आहे. हे सर्व सदस्य गर्भश्रीमंत औद्योगिक घराण्यांशी संबंधित आहेत.
बातम्या आणखी आहेत...