आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जप्तीची ५३६६ टन डाळ खुल्या बाजारात, किमती कमी करण्यासाठी केंद्राचे पाऊल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- विविध राज्यांतील साठेबाजांकडून छाप्याच्या वेळी जप्त करण्यात आलेल्या १.३२ लाख टन डाळींपैकी ५३६६ टन डाळ सरकारने खुल्या बाजारात आणली आहे. डाळींच्या वाढत्या किमती कमी करण्यासाठी केंद्राने हे पाऊल उचलले आहे.

देशात २०१४-१५ या हंगामात डाळींचे उत्पादन दोन दशलक्ष टनांनी कमी झाले होते. अपुऱ्या पावसाचा फटका डाळ उत्पादनाला बसला होता. परिणामी देशात डाळींचे भाव किलोमागे १८० रुपयांपर्यंत पोहोचले. डाळींच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने विविध राज्यांतील साठेबाजांवर कारवाई करून अतिरिक्त १.३२ लाख टन डाळ जप्त केली होती. मागणीप्रमाणे बाजारात डाळ उपलब्ध व्हावी यासाठी सरकारने यापैकी ५३६६ टन डाळ बाजारात आणली आहे. ही डाळ छत्तीसगड, दिल्ली, कर्नाटक, ओडिशा, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यातील बाजारांत आणण्यात आली आहे. सर्वाधिक १९४५.८ टन डाळ मध्य प्रदेशात आली आहे.