आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 6500 New Job Vacancy In Google, Google Campus In Hyderabad

६५०० नवे राेजगार: हैदराबादेत अाशियातील पहिला गुगल कॅम्पस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- हैदराबादेत गुगल आशियातील स्वत:चा पहिला कॅम्पस सुरू करणार आहे. अमेरिकेबाहेरचा अशा प्रकारचा हा पहिलाच कॅम्पस असून १००० कोटी गुंतवणुकीतून उभारल्या जाणाऱ्या या कॅम्पसमुळे पुढील चार वर्षांत ६५०० नव्या नोकऱ्या मिळतील आणि गुगलच्या देशातील कर्मचाऱ्यांची संख्या १३००० वर जाईल.
हैदराबादेतील गचीबोवली या मुख्य आयटी कॉरिडोरमध्ये गुगलला ७.२ एकर जागा दिली जाणार आहे. तेथे गुगल स्वत:ची इमारत उभारेल, असे तेलंगणचे माहिती तंत्रज्ञान मंत्री के. टी. रामाराव यांनी सांगितले. राव यांच्या अमेरिका दौऱ्यात गुगल आणि तेलंगण सरकारमध्ये सामंजस्य करार झाला. २०१९ पर्यंत हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा गुगलचा मानस आहे.