आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या वर्षात संघटित क्षेत्रात मिळणार ८.७५ लाख नोकऱ्या, माय हायरिंग क्लब डॉट कॉमचा औद्योगिक अहवाल प्रसिद्ध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- वर्ष २०१७ मध्ये नोकरीसाठी भटकणाऱ्या बेरोजगारांसाठी आनंदाची बातमी आहे. एका सर्व्हेनुसार संघिटत क्षेत्रात तब्बल ८.७५ लाख नव्या नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. नोटबंदीमुळे रिअल इस्टेट क्षेत्रात काही काळ मंदीचे वातावरण होते, परंतु याचा संघटित क्षेत्रावर परिणाम झालेला नाही. येथे नोकरीच्या अधिक संधी मिळणार आहेत. माय हायरिंग क्लब डॉट कॉम अँड जॉब पोर्टलने या सर्व्हेसाठी २१ मोठ्या शहरात ६७९० कंपन्यांशी चर्चा केली. या कंपन्या १२ औद्योगिक क्षेत्रांतील आहेत. पोर्टलचे सीईओ राजेशकुमार यांनी सांगितले, उत्पादन आणि अभियांत्रिकी विभागात जास्त नोकरीच्या संधी आहेत. श्रेणी २/३ शहरात महानगरांच्या तुलनेत जास्त नोकरीच्या संधी असतील. कंपन्या छोट्या शहराकडे जातील.  नोकरी सोडण्याचा दर म्हणजे अॅट्रिशन रेटसुद्धा पाच वर्षांत सर्वात कमी असेल.
  
वर्कफोर्स सोल्युशन कंपनी केली सर्व्हिसेस इंडियाचे एमडी बी. एन. थमय्या यांनी सांगितले,  बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात आपले बस्तान मांडतील. या कंपन्या  डिजिटल तसेच स्मार्ट सिटीसारख्या योजनेत आपल्या संधी शोधतील. यामुळे कुशल कामगारांची मागणी वाढणार आहे. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपती झाल्यानंतर आयटी निर्यातीवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. परंतु काही फायदेही आहेत. टॅलेंट अॅडव्हायझरी फर्म हंट पार्टनर्सचे मॅनेजिंग पार्टनर  सुरेश रैना यांनी सांगितले, अमेरिकेत उत्पादन वाढल्याचा भारतालाच फायदा होणार आहे.  

ट्रम्प यांच्या चीनविरोधी भूमिकेचा भारताला फायदा  
- डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटी प्रकल्पातील आयटी क्षेत्रात ३० ते ३५ हजार लोकांना नोकरी मिळणार आहे.  
- शहरात पायाभूत सुविधा वाढल्याने बिल्डिंग मटेरियल, सिमेंट, ऑटोमेशनमध्ये १.५ लाख नव्या नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे.  
- चीनविरोधी भूमिकेमुळे केमिकल्स, फार्मा आणि इंजिनिअरिंग उद्योगास फायदा मिळेल.  
- डिजिटल मोहिमेत पेमेंट बँक आणि अशा दुसऱ्या कंपन्यांत लाेकांची गरज भागेल  
- डाटावर फोकस वाढल्याचा अर्थ  डाटा अॅनालिटिक्समध्ये कुशल तंत्रज्ञाची गरज भासणार आहे.  - माहिती व सायबर सुरक्षा, एनर्जी, फार्मा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात नोकरीच्या संधी

सरासरी वेतनवाढ ९ %  
२०१७ मध्ये वेतनवाढ सरासरी ९ % इतकी राहण्याची अपेक्षा आहे. क्षेत्राच्या दृष्टीने पाहिल्यास उत्पादन अाणि इंजिनिअरिंग क्षेत्रात ९.७ टक्के वेतनवाढ मिळेल. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात सर्वात कमी म्हणजे ५ % वेतनवाढ असेल.
बातम्या आणखी आहेत...