आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त ८ वी पास आणि उलाढाल मात्र ५० कोटींची, वाचा या छोट्या लोकांच्या मोठ्ठ्या गरुडझेपेविषयी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणतेही उच्च शिक्षण, व्यावसायिक शिक्षण नाही, आणि कोणताही अनुभवही नाही. पण तरीही हे लोक मोठमोठ्या डीग्री होल्डर्सला मागे टाकत आहेत. यांमधील कोणीही जास्त शिकलेला नाही. टीमबद्दल बोलायचे झाल्यास साधारणतः ८ वी पास असतील सगळे. मात्र त्यांच्या कामाची पध्दत आणि नेटवर्क एवढे मजबूत आहे की, मोठ मोठ्या कंपन्यांसाठीही ते आदर्श बनले आहेत. विचारात पडलात का आम्ही कोणाबद्दल बोलतोय ते... आम्ही बोलतोय मुंबईतील डब्बेवाल्यांबद्दल...

मुंबई डब्बेवाल्यांशी जुडलेला जवळपास प्रत्येक व्यक्ती हा साधारणतः ८ वी पास आहे. मात्र त्यांचे काम एवढे अचूक आणि शिस्तबध्द आहे की, फेड एक्स आणि एचयूएल यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी सु्ध्दा यांच्याकडून मार्केटींग टीप्स घेतल्या आहेत. व्हर्जिन एअरलाईन्सचे प्रमुख रिचर्ड ब्रॅन्सन आणि प्रिंस चार्ल्ससुध्दा या व्यक्तींचे कौतुक करायला विसरले नाहीत. नुतन मुंबई टीफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशनच्या बॅनर अंतर्गत काम करणारे मुंबईचे डब्बेवाले दररोज २ लाखांपेक्षा जास्त लंचबॉक्स डिलेव्हर करतात. या असोसिएशनचे वार्षिक उत्पन्न जवळपास ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

पुढील स्लाईडवर वाचा, कशाप्रकारे काम करतात मुंबईचे डब्बेवाले आणि काय आहे त्यांच्या यशाचे रहस्य..
बातम्या आणखी आहेत...