आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरापेक्षा ग्रामीण कर्जदार कुटुंबीयांची संख्या 9 % जास्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली : शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील कर्जदार कुटुंबीयांची संख्या ९ टक्के जास्त आहे. एकीकडे शहरातील २२.४ टक्के कुटुंबीयांनी कर्ज घेतलेले असताना दुसरीकडे ग्रामीण भागातील ३१.४ टक्के कुटुंबीयांनी कर्ज घेतले आहे. ही माहिती नॅशनल सॅम्पल सर्वे (डेट आणि इन्व्हेस्टमेंट) नावाच्या अहवालात समोर आली आहे.

हा अहवाल जानेवारी ते डिसेंबर २०१३ दरम्यान देशातील ४,५२९ गाव आणि ३,५०७ शहरी परिसरातील १,१०,८०० कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर तयार करण्यात आला आहे. या अहवालानुसार देशभरात प्रतिकुटुंब कर्जाची सरासरी ग्रामीण भागात १,०३,४५७ रुपये तर शहरी भागात ३,७८,२३८ रुपये आहे.
ग्रामीण आणि शहरी परिसरात ९० टक्के कर्ज हे जमीन किंवा घरासाठी घेण्यात येते. ग्रामीण भागात विविध व्यावसायिक वापरासाठी कर्जाची भागीदारी ११ ते ५६ टक्के आहे.
ग्रामीण भागात विना संस्थात्मक क्रेडिट संस्था १९ टक्के तर संस्थात्मक क्रेडिट संस्थांनी १८ कुटुंबीयांना कर्ज दिलेले असल्याचे या अहवालात समोर आले आहे.
शहरी भागात संस्थात्मक क्रेडिट संस्था कर्ज देण्याच्या बाबत जास्त महत्त्वाची भूमिका निभावत असल्याचे दिसून आले. अशा संस्थांनी शहरातील १५ टक्के कुटुंबीयांना कर्ज दिलेले आहे. तर अ-संस्थात्मक क्रेडिट संस्थांनी शहरी भागतील फक्त १० टक्के कुटुंबीयांना कर्ज दिलेले आहे.
ग्रामीण भागातील कर्ज देणाऱ्या संस्थात्मक क्रेडिट संस्थांची भागीदारी ५६ टक्के तर अ-संस्थात्मक क्रेडिट संस्थांची भागीदारी ४४ टक्के आहे. तर शहरी भागात हा आकडा अनुक्रमे ८५ आणि १५ टक्के आहे.
बँकांची हिस्सेदारी २५ टक्के
ग्रामीण भागात सहकारी समित्या आणि व्यावसायिक बँकांची कर्जाची एकूण हिस्सेदारी ५० टक्के आहे. यामध्ये सहकारी समित्यांची भागीदारी (२४.८ टक्के) बँकांपेक्षा (२५.१ टक्के) थोडी कमी आहे.
विना संस्थात्मक क्रेडिट संस्थांमध्ये “सावकारी कर्ज’चा (२८.२ टक्के) सर्वाधिक महत्त्वाचा हिस्सा आहे. तर शहरी भागात सहकारी समिती आणि व्यावसायिक बँकांचे एकूण कर्जाची भागीदारी ७५ टक्के आहे.
यामध्ये त्यांची भागीदारी अनुक्रमे १८ टक्के आणि ५७ टक्क्यांपेक्षा काही प्रमाणात कमी आहे. शहरी भागात खाजगी बँका जास्त खर्ज देत असल्याचे समाेर आले आहे.
अहवालातील आकडेवारी अशी
कर्जाची स्थिती ग्रामीण भाग शहरी भाग
साधारण व्याजावर कर्ज २०.३ % १३.४ %
व्याजमुक्त कर्जाचे चलन ८.५% ४.५%
जास्त कालावधीचे कर्ज १०% १२%
मध्यम कालावधीचे कर्ज १२% ८%
कमी कालावधीचे कर्ज १२% ५%
खासगी सिक्युरिटी २०% १२%
अचल मालमत्तेवर सिक्युरिटी ७% ५%
बातम्या आणखी आहेत...