आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लिपकार्टमध्ये मायक्रोसॉफ्ट, ईबेकडून 9000 कोटींची गुंतवणूक; ई-कॉमर्समध्ये सर्वात मोठी गुंतवणूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक मिळवली आहे. मायक्रोसॉफ्ट, ईबे आणि टेनसेंटने यात १.४ अब्ज डाॅलर (सुमारे ९००० कोटी रुपये)ची गुंतवणूक केली आहे. ईबे अमेरिकेतील ई-कॉमर्स कंपनी असून टेनसेंट चायनीज गुंतवणूक कंपनी आहे. 

फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांनी ही माहिती दिली. फ्लिपकार्टच्या वतीने स्नॅपडील खरेदी करण्याची चर्च असताना आता या गुंतवणुकीचे वृत्त आले आहे. गुंतवणूकदार संस्था टायगर ग्लोबल, नॅस्पर्स समूह, एक्सेल पार्टनर्स आणि डीएसटी ग्लोबलने फ्लिपकार्टमध्ये आधीच गुंतवणूक केलेली आहे.

या कराराच्या आधारावर फ्लिपकार्टची व्हॅल्यू ११.६ अब्ज डॉलर (७५,००० कोटी रुपये) निश्चित करण्यात अाली आहे. २००७ मध्ये आलेली फ्लिपकार्ट लिस्टेड कंपनी नाही. त्यामुळे अशा कंपनीची व्हॅल्युएशन यात गुंतवणूक करण्यात अालेल्या आकडेवारीवर निश्चित करण्यात येते.

मे २००५ मध्ये गुंतवणूकदार संस्था टायगर ग्लोबलने यात ४,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्या वेळी या कंपनीची व्हॅल्यू १५.२ अब्ज डॉलर (९८,००० कोटी रुपये) निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर याच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. सध्याचे मूल्यही सर्वाधिक मूल्याच्या २३ टक्के कमी आहे. मार्च महिन्यात जागतिक गुंतवणूकदार बँकिंग संस्था मॅक्वायरी समूहाने या कंपनीची किंमत ९.९५ अब्ज  डॉलर असल्याचे सांगितले हाेते.

ईबे इंडियाला फ्लिपकार्टने घेतले विकत 
या करारानुसार अमेरिकी कंपनी ईबे आपला भारतातील बिझनेस फ्लिपकार्टचा विक्री करेल आणि ५० कोटी डॉलर म्हणजेच सुमारे ३,२५० कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. या बदल्यात ईबेला  फ्लिपकार्टमध्ये इक्विटी भागीदारी मिळेल. हा करार या वर्षाच्या शेवटपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. ईबे डॉट इन विविध प्लॅटफॉर्मच्या स्वरूपात काम करते. दोन्ही कंपन्यांमध्ये एक करार झाला आहे. फ्लिपकार्टच्या प्लॅटफॉर्मवर वस्तू विकणारे ईबेच्या माध्यमातून इतर देशांमध्ये आपल्या वस्तूंची विक्री करू शकतील. याच प्रमाणे इतर देशात ईबेवर विक्री होणारी उत्पादने आता भारतात आपल्या वस्तूंची विक्री करू शकतील. 

फ्लिपकार्टने आतापर्यंत खरेदी केलेल्या कंपन्या
- २०१० - व्ही रीड 
- २०११  – चकपक 
- २०१२ – लेट्सबाय, माइम ३६० 
- २०१४ – मिंत्रा, जीव्स 
- २०१५ – एडआयइक्विटी, एनजीपे, एफएक्स मार्ट 
- २०१६ – फोनपे, जाबोंग

काय होईल या गुंतवणुकीमुळे 
असोचेमच्या अभ्यास अहवालानुसार २०१६ मध्ये भारतात ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांची संख्या ६.९ कोटी होती. यांची संख्या २०१७ मध्ये १० कोटींच्या वर जाईल. कंपन्या हा बाजार ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच कंपन्या तोटा सहन करूनदेखील सवलतीच्या दरामध्ये वस्तूंची विक्री करत आहेत. आतापर्यंतच्या गुंतवणुकीचा वापर बिझनेस वाढवण्यासाठी अाणि सवलत देण्यासाठीच करण्यात आला. 
बातम्या आणखी आहेत...