आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलायन्स इंडस्ट्रीजला 9,108 कोटींचा नफा; एकाच तिमाहीतील सर्वाधिक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल)ला एप्रिल-जून तिमाहीमध्ये विक्रमी नफा झाला आहे. गुरुवारी घोषीत करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार या कालावधीत कंपनीला ९,१०८ कोटी रुपयांचा (प्रती शेअर ३०.८ रुपये) कन्सॉलिडेटेड नफा नोंदवण्यात आला आहे. हा गेल्या आर्थिक वर्षात समान तिमाहीमध्ये झालेल्या ७,११३ कोटी रुपयांपेक्षा २८ टक्के जास्त आहे. नफा वाढवण्यात रिफायनिंग मार्जिनमध्ये झालेली वाढ आणि आफ्रिकी कंपनीमधील भागीदारी विक्रीमुळे मिळालेल्या रकमेचे महत्त्वाचे योगदान आहे.  

आरआयएलचे जामनगर (गुजरात) मध्ये जगातील सर्वात मोठे रिफायनिंग कॉम्प्लेक्स आहे. येथे कच्च्या तेलापासून इंधननिर्मिती करण्यातून नफ्यातील मार्जिन ११.९ डॉलर प्रती बॅरल राहिली आहे. हा आकडा नऊ वर्षांतील सर्वात जास्त आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीमध्ये हा अाकडा ११.५ डॉलर प्रती बॅरल होता. पेट्रोकेमिकल्सचा एबिटा मार्जिनदेखील १५.८ टक्क्यांसह सर्वाधिक उच्चांकी पातळीवर आहे. कंपनीला पहिल्या तिमाहीमध्ये गल्फ अाफ्रिका पेट्रोलियम कॉर्पोरेशन (जीएपीसीओ) मधील भागीदारी विक्रीतून १,०८७ कोटी रुपयांचा विशेष नफा झाला आहे.  

कर्ज २ % वाढले, नगदी रिझर्व्ह ६.६ टक्के कमी  
रिलायन्सच्या कर्जात दोन टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी जून तिमाहीमध्ये हा १,९६,६०१ कोटी रुपये होता. या वर्षी हा अाकडा वाढून २,००,६७४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. नगदी रिझर्व्ह, जो ७७,२२६ कोटी रुपये होता, तो या वर्षी ६.६ टक्क्यांनी कमी होऊन ७२,१०७ कोटी रुपयांवर आला आहे. असे असले तरी आरआयएलने दूरसंचार व्हेंचर जिओच्या बाबतीत जास्त माहिती दिलेली नाही. जिओने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात देशातील दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केला होता. कंपनीच्या कर्जातील वाढ आणि नगदीत यामुळेच घट झाली आहे. जिओवर आणखी काही घोषणा शुक्रवारी कंपनीच्या एजीएममध्ये होण्याची शक्यता आहे.

महसुलात 26.7 % वाढ  
- किंमत व डिझायनिंग व्हॉल्युममध्ये वाढ झाल्यामुळे आरआयएलचा महसूल २६.७% वाढून ९०,५३७कोटी रु. राहिला.  
- यात किरकोळ व्यापारात झालेल्या वाढीचा महत्त्वाचा वाट राहिला. हा ७३.६ टक्क्यांच्या वाढीसह ११,५७१ कोटी रुपयांवर पोहोचला.  
- किरकोळ व्यवसायाच्या महसुलात ७४ टक्क्यांची वाढ दिसून आली.  

पगारावरील खर्चात १६.३ % वाढ
कर्मचाऱ्यांच्या पगारावरील खर्च १६.३ टक्क्यांनी वाढून २,४५५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, तर वीज - इंधनावरील खर्च वाढल्यामुळे इतर खर्चात २०.२ टक्क्यांची वाढ झाली आहे. हा आकडा वाढून १०,३३२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.  

विप्रो ११,००० कोटी रुपयांचे शेअर करणार बायबॅक  
देशातील तिसरी सर्वात मोठी आयटी संस्था विप्रोने १.२ टक्क्यांचा नफा नोंदवला आहे. कंपनीचा एप्रिल ते जून तिमाहीमधील कन्सोलिडेटेड नफा २,०७६.७ कोटी रुपये राहिला. एक वर्षापूर्वी समान कालावधीत हा अाकडा २,०५२ कोटी रुपये होता. कंपनीच्या संचालक मंडळाने बायबॅकवर ११,००० कोटी रुपये खर्च करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. एकूण ३४.३ कोटी रुपयांचे शेअर बायबॅक करण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये प्रती शेअरची किमत ३२० रुपये ठेवण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...