आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 मित्रांना 'भांग'मधून मिळाली बिझनेस आयडिया, रतन टाटांनी केली 6.8 कोटींची गुंतवणूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली - भाग हा नशा करण्याचा भारतातील सर्वात जुना, पारंपरिक आणि प्रचलित असा मार्ग समजला जातो. देशातील बहुतांश भागांमध्ये भांगाची व्यावसायिक शेती करण्यावर बॅन आहे. पण मुंबईतील एक स्टार्टअप असे आहे, जे भांगाची शेती फायद्याची असल्याचे दाखवून देत आहेत. मुंबईच्या 7 मित्रांकडून सुरू करण्यात आलेल्या या मेडिकल रिसर्च कंपनीचे नाव 'बॉम्‍बे हेम्‍प कंपनी' म्हणजे BOHECO आहे. त्याचा उद्देश भांगेच्या वैद्यकीय आणि औद्योगिक वापराची सुरुवात करणे हे आहे. 


BOHECO भारतात भांगेशी संबंधित इंडस्ट्रीसाठी संपूर्ण इकोसिस्टीम डेव्हलप करत आहे. त्याची सुरुवात त्यांनी  हॅम्‍प फायबरने केली आहे. त्यांच्या या जगावेगळ्या कल्पनेवर रत‍न टाटांनीही पैसा लावला आहे. चला तर मग जाणून घेऊयात या कंपनीला प्लान नेमका आहे आणि भांगेपासून काय काय बनवण्याचा यांचा विचार आहे.     

 
टाटांनी गुंतवले 6.8 कोटी 
गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये रतन टाटा आणि गूगल इंडियाचे MD राजन आनंदन यांच्या इनव्हेस्टर्स ग्रुपने BOHECO मध्ये एक मिलियन डॉलर म्हणजे सुमारे 6.8 कोटींची गुंतवणूक केली होती. त्यांनंतरच या स्टार्टअपबाबत चर्चा झाली. 2013 में मध्ये सुरू झालेल्या BOHECO मध्ये भांगेचे सीड ब्रीडिंग, नॅनो टेक्‍नोलॉजी, 
मटेरियल सायन्स, हेल्‍थ अँड न्‍यूट्रीशन, टेक्‍सटाइल, पोस्‍ट हार्वेट टेक्‍निक यासह भांगेच्या सहाय्याने बिल्डिंग मटेरियल तयार करण्याबाबत रिसर्च सुरू आहे. 


फायबरचा चांगला स्रोत
आंत्रप्रिन्‍योर इंडियाशी बोलताना BOHECO चे को फाऊंडर चिराग टेकचंदानी यांनी सांगितले की, संशोधनात हे स्पष्ट झाले की, हजारो वर्षांपासून भांग हे अत्यंत कामाचे ठरलेले आहे. त्याचा इतिहास पाहता भांग हा फायबरचा उत्कृष्ट स्रोत आहे. तनाव सहण करण्याची क्षमता आणि कमी मेंटेनन्स यामुळे याला कापड इंडस्ट्रीमध्ये चांगले भवितव्य आहे. भारत टेक्‍सटाइलवर आधारित देश आहे. त्यामुळे भांगेशी संबंधित फायबर आणि कोटेजशी संबंझित इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर सुरू व्हायला हवी. 

 
अनेक समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न 
चिराग सांगतात की, त्यांच्या स्टार्टअपचा उद्देश फक्त कपड्यासाठी भांगेचे उत्पादन एवढाच नाही. तर या रोपाच्या उत्पादनाने एकाचवेळी आपल्या अनेक समस्यांवर तोडगा निघू शकतो. हे एक महत्त्वाचे पिक आहे. त्याचा वापर टेक्‍सटाइल, कन्स्‍ट्रक्‍शन, एनर्जी, मेडिसीन आणि फूड इंडस्‍ट्रीसाठी एकाचवेळी करता येऊ शकतो. पण भारतात आपण भांगेला नशेचे साधन समजले आहे. त्यामुळे भांगेला आपल्या इकोसिस्टीममध्ये समाविष्ट करण्यापूर्वी त्यावर सखोल संशोधन करण्याचा आम्ही विचार केला. 

 
पुढे वाचा, चीनहून करावी लागले आयात.. 
अदर सोर्स: फोर्ब्‍स आणि युवर स्‍टोरी डॉटकॉम  

 

बातम्या आणखी आहेत...