आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षमता वाढवण्यासाठी सिलिकॉन व्हॅलीमधील कर्मचारी करताहेत बर्फाच्या पाण्याने अंघोळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेचेरी रॅप - Divya Marathi
जेचेरी रॅप

कॅलिफोर्निया- जास्त वेळ काम आणि कामात चांगले प्रदर्शन दाखवण्यासाठी सिलिकॉन व्हॅलीतील नवउद्योजक आणि कर्मचारी सध्या अनोख्या पद्धतीचा अवलंब करत आहेत. याला ‘पॉझिटिव्ह स्ट्रेस’ असे म्हटले जाते. त्यासाठी येथील कर्मचारी बर्फाच्या पाण्याने अंघोळ करत आहेत, उपवास, हॉट योगा आणि कॅम्पमध्ये सहभागी होण्यासारख्या उपायांचा अवलंब करत आहेत. यामुळे त्यांना त्रास होत असला तरी ते दैनंदिन व्यवहारात याचा समावेश करत आहेत. 

 
जेचेरी रॅप हेदेखील त्यांच्यातीलच एक आहे. त्यांच्या दिवसाची सुरुवात लवकर होते, त्यानंतर रनिंग आणि ई-मेल पाहताना कॉफी संपते. त्यानंतर शरीराला आखडून टाकणाऱ्या थंड पाण्याने ते अंघोळ करतात. आता हा दैनंदिनीचा भाग झाला असल्याचे रॅप यांनी सांगितले. तीन हेल्थ-बायोटेक स्टार्टअपवर लक्ष ठेवण्यासाठी १८ तास काम आणि त्यातून होणार ताण कमी करण्यासाठी या जीवनशैलीचा उपयोग लाभदायी आहे. यामुळे ते कामाला जास्त वेळ देत आहेत. रॅप सध्या डिजिटल हेल्थ स्टार्टअप्स फेनोमॅक्स, सिग्मा जेनेटिक्स आणि मेडिकल डिव्हाइस मेकर आल्टोइडा मध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत.   


त्याचबरोबर तंत्रज्ञान क्षेत्रातील या लोकांना उपवास (उपाशी राहणे) देखील आवडत आहे. फेसबुकमध्येच अॅनालिटिक्स संचालक डॅन जिगमाँड यांनी केवळ ९ तासांतच (वर्किंग अवर) जेवणाचा नियम पाळत त्यांचे वजन कमी केले आहे. यातून जास्त ऊर्जा मिळत असल्याचे डॅन यांनी सांगितले. 


सिलिकॉन व्हॅलीला याची प्रेरणा खेळाडू आणि मोटिव्हेशनल स्पीच देणाऱ्या विम हॉफ यांच्याकडून मिळाली. सुमारे वर्षभरापासून ते प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून येथील लोकांना दैनंदिन जीवनात बदल करण्यासाठी प्रेरित करत होते. सिलिकॉन व्हॅलीमधील गुंतवणूकदार आणि पॉलो आल्टो हेज फंडचे व्यवस्थापनातील भागीदार जून युन यांनीदेखील अनेक कार्यक्रमात ‘पॉझिटिव्ह स्ट्रेस’चे फायदे सांगितले आहेत. थंड पाण्याने अंघोळ करणेच आवश्यक नसल्याचे ते म्हणाले. नवीन मार्गाने कार्यालयात जाणे, महिन्यात एकदा आवडीचे चिप्स खाणे किंवा नव्या पद्धतीचा व्यायाम केल्यानेही तुमच्या दैनंदिनीत बदल होतो. त्याचाही तुमच्या कामावर परिणाम दिसून येतो. 

 

‘पॉझिटिव्ह स्ट्रेस’मुळे शरीर जास्त काम करण्यासाठी तयार होते  

रॅप यांनी सुमारे वर्षभरापासून या पद्धतीचा अवलंब केला असून, पॉझिटिव्ह स्ट्रेस सर्वांसाठी फायदेशीर नसल्याचे त्यांचे मत आहे. शरीराला अत्यंत कमी तापमानाचा आघातही नको आहे. हळूहळू करून याचा अवलंब करायला हवा. रॅप यांनी सांगितले की, ‘याच्या फायद्यामुळे मागील वर्षात मी एकदाच आजारी पडलो आहे. दररोजचा ताण एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीमध्ये जाताना आलेल्या थकव्याप्रमाणे असतो. तर पॉझिटिव्ह स्ट्रेस शरीराची क्षमता वाढवून त्याला जास्त सहनशील बनवते.’ नवीन लोकांना कमीत कमी त्रास होण्यासाठी अॅपही आहेत. सध्या तरी तंत्रज्ञानाच्या या चमकणाऱ्या जगासाठी हा ट्रेंड आवडीचा ठरत आहे.  

 

बातम्या आणखी आहेत...