आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅपल 220 डिजिटल मॅगझिनचे ‘अॅप टेक्श्चर’ खरेदी करण्याच्या तयारीत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅलिफोर्निया- स्मार्टफोन, संगणक, स्मार्टवॉच यासारखी उत्पादने बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी अॅपल प्रसारमाध्यमांच्या व्यवसायात मोठे पाऊल टाकत आहे. अॅपल “टेक्श्चर’ नावाचे डिजिटल मॅगझिन अॅप खरेदी करण्याच्या तयारी आहे. कंपनीने व्यवहाराचे स्वरूप स्पष्ट केले नाही. टेक्श्चर अॅप व्हर्च्युअल न्यूजस्टँडप्रमाणे आहे. यावर दर महिन्याला ६५० रुपयांत नॅशनल जिओग्राफिक, व्हॅनिटी फेअर व वॉगसारख्या २०० मासिकांचे वर्गणीदार हाेता येते. अॅपलच्या प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर अॅपच्या युजर्सची संख्या वाढण्याची शक्यता आहे.  


अमेरिकेत मासिकांची लोकप्रियता १० वर्षांहून जास्त काळापासून घसरत आहे. यातून सावरण्यासाठी २००९ मध्ये प्रकाशक एका मंचावर एकत्र आले. यानंतर २०१० मध्ये टेक्श्चर अॅप लाँच केले होते. यास  “मॅगझिनचे नेटफ्लिक्स’ म्हटले जाते. 


सध्या हे अमेरिका व कॅनडात उपलब्ध आहे. टेक्श्चर नावाची कंपनी सिलिकॉन व्हॅलीत आहे, मात्र याचे बहुतांश प्रकाशक न्यूयॉर्कमध्ये होते. टेक्श्चरचे म्हटले की, अॅपलच्या माध्यमातून त्यांना नवीन वाचक मिळाले आहेत.  


टेक्श्चरच्या खरेदीची माहिती अॅपलचे सीनियर व्हाइस प्रेसिडेंट ए.डी. क्यू यांनी दिली. एका कार्यक्रमात त्यांना व्हिडिओ सामग्रीबाबत विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की, अॅपल सामग्रीच्या दर्जावर काम करत अाहे. अॅपल नेटफ्लिक्स किंवा डिस्नेची खरेदी करेल, असा अंदाज आतापर्यंत बांधला जात होता. व्हिडिओ कंटेंट तयार करण्यासाठी अॅपलने मूव्ही व टीवी उद्योगातील दिग्गजांना नियुक्त केले आहे.  


गुगल, फेसबुक व अॅमेझॉनसारख्या अन्य तंत्रज्ञान कंपन्याही न्यूज बिझनेसमध्ये आहेत. मात्र, अॅपल व त्यांच्यात मुळात एक फरक आहे. अॅपलच्या न्यूज अॅग्रिगेटर अॅप “अॅपल न्यूज’मध्ये संपादकीय टीम आहे. युजर कोणती बातमी पाहतील हे ते ठरवतात. अन्य कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर टूलद्वारे निश्चित होते. पिऊ रिसर्चच्या ऑगस्ट २०१७ च्या अभ्यासानुसार दोन तृतीयांश अमेरिकींना साेशल मीडियातून बातम्या मिळतात.  

बातम्या आणखी आहेत...