आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 लाख किमतीची गाय 1000 रुपयात विकतेय लष्कर, 25 हजार गायींची करणार विक्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दि‍ल्‍ली - भारतीय लष्कर सुमारे 1 लाख किमतीच्या चांगल्या वाणाच्या गायी अवघ्या 1000 रुपयांत विक्री करणार आहे. लष्कराकडे फ्रिसवाल जातीच्या 25000 गायी आहेत. लष्कर त्यांचे 39 फार्म बंद करत आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यातच हा निर्णय घेण्यात आला होता. फार्म बंद करण्यासाठी त्यांना गायी विकायच्या होत्या, पण एवढ्या महागड्या गायींना खरेदीदार मिळाले नाही. इकॉनॉमि‍क्‍स टाइम्‍सनुसार लष्कराने निर्णय घेतला आहे की, उच्च वाणाच्या या गायी सहकारी दूध संघ किंवा इतर सरकारी विभागांना अवघ्या प्रत्येकी 1 हजार रुपयांत विकणार आहे. गायींना नेण्यासाठी लागणारा खर्च मात्र खरेदी करणाऱ्यांना करावा लागेल. 

 

एक फ्रि‍स्वाल गाय सरासरी 3600 लीटर दूध देते. तर राष्ट्रीय सरासरी सुमारे 2000 लीटर आहे. काही निवडक फ्रिसवाल गायी तर 7000 लीटर पर्यंत दूध देतात. लष्कराकडे एकूण 39 फार्म्स आहेत. ते बंद करायचे आहेत. पण या गायींमुळे हे काम अटकले आहे. संपूर्ण देशात मि‍लि‍ट्री फार्म 1889 मध्ये सुरू केले होते. जवानांना ताजे दूध व डेअरी प्रोडक्ट मिळावे हा त्यामागचा उद्देश होता. 

 

पुढे वाचा, संबंधित माहिती

 

बातम्या आणखी आहेत...