आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

24 वर्षांच्या गोगोईने 10 रुपयांत सुरू केला होता व्यवसाय, आता वर्षाकाठी कमावतो 6 लाख

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल तर तुम्ही जीवनातील कोणत्याही क्षणाचा नीडरपणे सामना करू शकता. आसाममधील शिवसागर या लहानशा गावातील हिरणमोय गोगोईला हे वाक्य अगदी तंतोतंत लागू होते. लहानपणीच भाऊ आणि आईच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरल्यानंतर त्याने 10 रुपयांत व्यवसाय सुरू केला. त्याच्या व्यवसायाचा वार्षिक टर्नओव्हर आता सहा लाख रुपये झाला आहे. या माध्यमातून तो आता 300 हून अधिक लोकांना रोजगार देत आहे. 


10 रुपयांत सुरू झाले 'गांव का खाना'
गोगोई यांनी 2016 मध्ये 'गांव का खाना' ची सुरुवात केली होती. त्याच्याकडे घरी एक गॅस सिलेंडर आणि स्टोव्ह होता. घरातील तांदूळ, डाळ, भाज्या याच्या मदतीने त्याने घरात व्यवसायाची सुरुवात केली. गोगोई म्हणाला की, त्याने फक्त मीठासाठी 10 रुपये खर्च केले. इतर साहित्य त्याला घरातूनच मिळाले. सुरुवातीला तो गावातून जेवण तयार करून शहरात लोकांना जोवण पोहोचवायचा. नंतर शहरातच त्याने याची सुरुवात केली.

 
ऑनलाइन झाला व्यवसाय 
गोगोई म्हणतात की, त्याने सुरुवातीला फेसबूकवर जाहिरात केली. त्यातून त्याला 120 रुपयांची पहिली ऑर्डर मिळाली होती. हळू हळू व्यवसाय वाढत गेला. त्यानंतर त्याना ऑनलाइन बिझनेस सुरू करण्याची आयडिया आली. नंतर त्याने गाव का खाना ही वेबसाईट तयार केली. 

 
6 लाखांचा वार्षिक टर्नओव्हर 
जून 2016 मध्ये गांव का खाना लाँच झाले. बिझनेस टर्नओव्हर 6 लाखांवर गेला. या आर्थिक वर्षात टर्नओव्हर 10 लाखांवर न्यायचा असे गोगोईचे ध्येय आहे. गोगोईने त्याच्या व्यवसायाचा विस्तारही केला आहे. आता तो नॉन-व्हेज लोणची तयार करतो. त्यासाठी त्याने 50 ऑथराइज्ड डिस्ट्रीब्यूटर तयार केले असल्याचेही सांगितले आहे. 

 
पुढे वाचा, आईकडून मिळाली प्रेरणा 

 

बातम्या आणखी आहेत...