आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भांडवल करभाराने सेन्सेक्स आपटला; गुंतवणूकदारांच्या 4.5 लाख कोटींना फटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली-  अर्थसंकल्पामध्ये  दीर्घकालीन भांडवल लाभ कराची तरतूद केल्यानंतर दुसऱ्या दिवशी शेअर बाजार आपटला. सेन्सेक्स ८४० अंक कोसळून ३५,०६७ वर तर निफ्टी २५६ अंक कोसळून १०,७६१ अंकांवर बंद झाला. ऑगस्ट २०१७ नंतर पहिल्यांदाच बाजार एवढ्या खाली आला आहे. 

 

व्यवसायाच्या शेवटच्या तासात विक्री वाढल्यामुळे सेन्सेक्स ९०० अंकांपर्यंत घसरला. राष्ट्रीय सूचकांकात २८१ अंकाची घसरण नोंदली गेली. आयटी वगळता सर्व सेक्टोरल निर्देशांक घसरले. घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे ४.५ लाख कोटींना फटका बसला.


क्षेत्रीय निर्देशांक घसरला : शुक्रवारी क्षेत्रीय निर्देशांकात केवळ निफ्टी आयटी निर्देशांक वधारून बंद झाला. निफ्टी आयटी निर्देशांकात ०.१५ टक्के वधारला. जास्त घसरण निफ्टी नियल्टी निर्देशांकात ६.१७ %राहिली. बँक निफ्टीत २.८३ टक्के ऑटो ३.३५ %, एफएमसीजीमध्ये ०.६३%, निफ्टी धातूमध्ये ३.०२%, निफ्टी मीडियात ३.५३%, निफ्टी फार्मा १.२७% निफ्टी पीएसयू बँकेत २.०९% व निफ्टी खासगी बँकेत ३.०३% घसरण राहिली.

 

दहा वर्षांत सातव्यांदा  अशी स्थिती 

गेल्या १० वर्षांत सेन्सेक्समध्ये ही सातवी सर्वात मोठी घसरण आहे. एका दिवसात सेन्सेक्समध्ये सर्वात मोठी घसरण २४ ऑगस्ट २०१५ रोजी झाली होती. या दिवशी सेन्सेक्स १६२४.५१ अंकावर बंद झाला होता. दुसरीकडे, २४ ऑक्टोबर २०१८ रोजी सेन्सेक्समध्ये १०७०.६३, १७ मार्च २०००८ रोजी ९५१.०३, ३ मार्च २००८ रोजी ९००.८४, ६ जुलै २००९ रोजी ८६९.६५, ६ फेब्रुवारी २०१५ रोजी ८५४.८६, २ जानेवारी २०१८ ८३९.९१, ११ फेब्रुवारी २००८ रोजी ८३३.९८, ११ फेब्रुवारी २०१६ रोजी ८०७.०७ व १० ऑक्टोबरला ८००.५१ अंक घसरला होता.  

 

 

घसरण का आली?  
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी अर्थसंकल्पात शेअरद्वारे होणाऱ्या कमाईवर लाँग टर्म कॅपिटल गेन कर(एलटीसीजीटी) लावण्याची घोषणा केली आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या भावनांवर परिणाम झाला. यात वर्षापेक्षा जास्त ठेवलेल्या समभागांवर एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न मिळत असेल तर गुंतवणूकदारांना १० % कर द्यावा लागेल. सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स(एसटीटी) हटवण्याचीही घोषण केली. म्हणजे गुंतवणूकदारांना दोन्ही प्रकारचे कर द्यावे लागतील.  

 

वित्तीय तूट

आर्थिक वर्ष १८ ची वित्तीय तूट ३.५ टक्के ठेवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. बाजारपेठेतील तज्ज्ञांनुसार, सरकारने वित्तीय तूट ३.२ टक्क्यांखाली ठेवल्यास बाजारासाठी हे सकारात्मक राहू शकते. मात्र, ३.६% टक्के लक्ष्य बाजारपेठेला निराश करणारे आहे.

बातम्या आणखी आहेत...