आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Car Will Cost; Hyundai December, The Possibility Of Raising Prices In Maruti January

सर्व कंपन्यांच्या कार महागणार: ह्युंदाई, मारुती जानेवारीपर्यंत किंमत वाढवण्याची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- होंडा, टोयोटा व महिंद्रानंतर टाटा मोटर्स व फोर्डनेही कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली. टाटाने २५ हजारांपर्यंत तर, फोर्डने कारच्या किमती ४ टक्क्यांपर्यंत वाढवल्या. ह्युंदईसुद्धा या महिनाअखेरपर्यंत किंमतवाढीची घोषणा करू शकते.


 वितरकांच्या मते, मारुती सुझुकी जानेवारीमध्ये ही घोषणा करण्याची शक्यता असून २०१७ मध्येही त्यांनी सर्वात शेवटी वाढ केली होती. किंमतवाढीमागे वाढते उत्पादन खर्च मुख्य कारण असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. टाटा मोटर्सचे मयंक पारीख यांच्या मते, बाजारातील बदलती स्थिती, निर्मिती खर्चातील वाढ व अन्य अनेक कारणांमुळे किमती वाढवण्यावर विचार करावा लागला. तथापि, कोणत्या मॉडेलवर किती किंमतवाढ होईल, हे अद्याप एकाही कंपनीने उघड केले नाही. दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात प्रवासी वाहनांच्या विक्रीत १४.२९ टक्के वाढ झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...