आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाचे स्वातंत्र्य अन‌् चांगल्या उत्पन्नासाठी निवडा फ्रीलान्सिंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिटल पेमेंट फर्म पेपालच्या संशाेधनानुसार भारत जगात फ्रीलान्सिंगची सर्वात माेठी बाजारपेठ बनला अाहे. ‘इनसाइट्स इनटू द फ्रीलान्सर्स इकोसिस्टिम’ नावाच्या या संशाेधनानुसार देशात एक काेटी फ्रीलान्सर्स असून, ते वार्षिक सरासरी १९ लाख रुपये कमावत अाहे. त्यामुळे नाेकरी व उत्पन्नाच्या दृष्टीने हे क्षेत्र एक मजबूत पर्याय म्हणून समाेर आले अाहे. परिणामी, तुम्ही अावडीचे काम साेईनुसार व चांगल्या उत्पन्नासह करू इच्छित असाल, तर फ्रीलान्सिंगपासून प्रारंभ करू शकता. 

 

असे मिळते काम

- ४९% जणांना रेफरन्सद्वारे मिळते फ्रीलान्सिंगचे काम

- ३०% जणांना सोशल मीडिया नेटवर्किंगने मिळते काम

- ३५% जणांना नेटवर्किंग इव्हेंटद्वारे 

- ३३% जणांना राेजगार संस्थांकडून 

- २९% जणांना ग्राहकांमार्फत मिळतात फ्रीलान्सिंगच्या संधी 

 

या क्षेत्रांत मिळेल काम 
कंटेंट रायटिंग, फाेटोग्राफी, ट्रान्सलेशन, एसईओ, डिजिटल मार्केटिंग, डेटा सायन्स आदी अशी क्षेत्रे अाहेत, जेथे फ्रीलान्सर्सची खूप मागणी अाहे. वेब अॅण्ड मोबाइल डेव्हलपमेंट, इंटरनेट संशाेधन व डेटा एंट्री हे भारतीय फ्रीलान्सर्सचा फोकस एरिया अाहेत. याशिवाय अकाउंटिंग, डिझाइन व कन्सल्टन्सी क्षेत्रांतही फ्रीलान्सर्सची संख्या वाढली अाहे. 

 

कामाचे उत्तम प्लॅटफॉर्म्स
इंटरनेटवर असे अनेक प्लॅटफॉर्म्स अाहेत, ज्यांच्या मदतीने तुम्हाला फ्रीलान्सिंगच्या कामाचे प्रकल्प मिळू शकतात. यात तुम्ही अपवर्क, फ्रीलान्सर व गुरू अादी संकेतस्थळांची मदत घेऊ शकता. यासह डिजिटल मार्केटिंग, डिझायनिंग, रायटिंगसारख्या शॉर्ट टर्म प्रकल्पांसाठी फिवेर संकेतस्थळाची मदत  घेतली जाऊ शकते. डिझायनिंग कामासाठी ९९ डिझायनिंगदेखील खूप प्रसिद्ध अाहे. 

 

सर्वप्रथम क्षेत्र निश्चित करा
स्वत:चे शिक्षण व अनुभवाच्या आधारे अापल्या कामाचे क्षेत्र निश्चित करा. नवीन काैशल्ये शिकूनही कामाचा विस्तार करू शकता. उदा.- सॉफ्टवेअर अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले नसेल; परंतु कोडिंगचे चांगले ज्ञान असेल तरीही फ्रीलान्सिंग प्रकल्प मिळू शकतात. उडेमी, कोर्सेरा अादी संकेतस्थळे याकामी मदत करतील. क्षेत्र निश्चित केल्यानंतर त्यावर लक्ष केंद्रित करा.

 

चांगला पोर्टफोलिअाे तयार करा
तुम्हाला चांगले प्रकल्प तेव्हाच मिळतील, जेव्हा तुमच्या कामाचे आऊटपुट चांगले असेल. त्यामुळे स्वत:च्या कामाचा पोर्टफोलिअाे तयार करा व त्यात कामाचे ज्ञान, अनुभव अादीची अपडेटेड माहिती असावी. काम देण्यापूर्वी ग्राहक प्रथम हे पाहताे. त्यासाठी स्वत:च्या चांगल्या प्रकल्पांची सविस्तर माहिती सोशल मीडियावर अपलोड करा.  

 

कामाची किंमत ठरवून घ्या
प्रत्येक प्रकल्पास कामानुसार पैसे निश्चित होतात; परंतु एक स्टॅण्डर्ड किंमत निश्चित केल्याने बाजारात तुमचे मूल्य बनते. अनेक संकेतस्थळे तास, अाठवडा व काही प्रतिप्रकल्पानुसार पेमेंट करतात. त्यांच्या पेमेंट मोडचीही माहिती असणे गरजेचे अाहे. अनेक संकेतस्थळांवर प्रकल्पासाठी लिलाव हाेताे. याबाबतही संपूर्ण माहिती मिळवणे अावश्यक अाहे. 

 

थेट साधा कंपनीशी संपर्क
कामासाठी थेट कंपनीशी संपर्क साधावा. काही ठिकाणी तुमची मागणी नाकारली, तर काही ठिकाणी स्वीकारली जाईल. सोशल मीडियाच्या मदतीनेही स्वत:च्या कामाची माहिती देऊ शकता. सुरुवातीला काम नाकारले जाऊ शकते; परंतु यश मिळेपर्यंत धीर धरला पाहिजे. तरच काम मिळेल.

बातम्या आणखी आहेत...