आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचारामुळे 4 ते 6 महिने प्रवास करू शकत नाही- मेहूलचे पत्र; तपास संस्थांवरच केले आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- नीरव मोदीनंतर त्याचा मामा आणि गीतांजली समूहाचा संचालक मेहू चौकसीनेही भारतात येण्यास नकार दिला आहे. प्रकृती खराब असल्याने तसेच पासपोर्ट निलंबित असल्याचे कारण मेहूलने दिले आहे. नीरव आणि मेहूल पंजाब नॅशनल बँकेमध्ये १२,७१७ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे मुख्य आरोपी आहेत. सीबीआयने या प्रकरणात सात मार्च रोजी मेहूलला चौकशीसाठी बोलावले होते. चौकसीने सात मार्च रोजीच ई-मेलवर सात पानांचे उत्तर पाठवले आहे. त्याने ईडीलाही एक उत्तर पाठवले असून, त्यामध्ये भारतात येण्यास नकार दिला आहे.  

तपास संस्थांच्या वतीने होत असलेल्या या पूर्ण प्रक्रियेवर देखील त्यांनी टीका केली आहे. हा कायद्याचा दुरुपयोग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मी, माझे कुटुंबीय आणि माझ्या व्यवसायाच्या विरोधात पक्षपाती पूर्ण कारवाई करण्यात येत असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. पुढील चर्चा वकील संजय एबॉट यांच्याशी करावी, असेही त्यांनी सीबीआयला सांगितले आहे.  


सीबीआयच्या विशेष न्यायालयाने नीरव मोदी आणि मेहूल चौकसीच्या नावाने आधीच अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. त्यांच्या कंपन्यांतील तसेच पंजाब नॅशनल बँकेतील १९ कर्मचाऱ्यांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. तपासात मदत करण्यासाठी १३ देशांना पत्र पाठवण्यात आले आहे. 

 

मुंबई: घोटाळ्याचा आकार वाढण्याची शक्यता नाही : सचिव
 पंजाब नॅशनल बँकेतील झालेल्या फसवणूक प्रकरणात घोटाळ्याचा आकार वाढण्याची शक्यता नसल्याचे मत आर्थिक प्रकरणाचे सचिव सुभाष चंद्रा यांनी व्यक्त केले आहे. आतापर्यंत १२,७१७ कोटी रुपयांचे एलओयू घोटाळा पकडण्यात आले आहेत. मुंबईच्या पीएनबीच्या ब्रेड हाऊस शाखेमधून काही अधिकारी नीरव मोदी व मेहुल चौकसीच्या कंपन्यांना बनावटी एलओयू देत होते. त्या एलओयूच्या आधारावर या कंपन्या विदेशातील शाखांमधून कर्ज घेत होत्या.

बातम्या आणखी आहेत...