आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकच्या ‘जॉब अॅप्लिकेशन फीचर’ने खूप साेपे हाेईल नाेकरी शाेधण्याचे काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर नाेकरी शाेधण्यासाठी अाॅनलाइन पोर्टल्सची मदत घेत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी अाहे. फेसबुकही लवकरच एक नवे फीचर अाणत अाहे. त्याच्या माध्यमातून प्राधान्यक्रमाच्या आधारे  नाेकरी शाेधू शकाल. त्यासाठी फेसबुक थेट नाेकरीचा शाेध व अर्ज करण्यासाठी स्वत:च्या प्लॅटफॉर्मचा विस्तार करत अाहे. यापूर्वी ‘फेसबुक डॉट कॉम/जॉब’वर नाेकरीचे पर्याय अमेरिका व कॅनडासाठी उपलब्ध हाेते. मात्र, अाता फेसबुकने अापल्या या जॉब अॅप्लिकेशन फीचरचा भारतसह ४० देशांसाठी  विस्तार केला अाहे. या फीचरचा उद्देश लहान व मध्यम आकाराच्या व्यवसायांशी निगडित नाेकऱ्यांची माहिती हुशार तरुणांपर्यंत पाेहाेचवणे हा अाहे. 


याबाबत फेसबुकचे मानणे अाहे की, स्थानिक व्यवसायच समुदायांना मजबूत करतात अाणि सुमारे ६० %पर्यंत नाेकऱ्या निर्माण सृजित करताे. त्यामुळे फेसबुक या फीचरच्या माध्यमातून व्यावसायिक कंपन्या व नाेकरी शाेधणारे उमेदवार या दाेघांना मदत करू इच्छित अाहे. फेसबुकच्या या फीचरमध्ये लॉगइन करून उमेदवार अापल्या अावडीच्या कार्यक्षेत्राशी निगडित जॉब अलर्टही सेट करू शकतील. याच्या एक्सप्लोर पर्यायात टाइप करून नाेकरी शाेधली जाऊ शकेल. तसेच काेणत्याही नाेकरीसाठी अर्ज करताना एक जॉब अॅप्लिकेशन तयार हाेईल, जी तुमच्या फेसबुक वर्क प्रोफाइलशी जुळत जाईल. विविध नाेकऱ्यांसाठी अर्ज करण्यापूर्वी अर्ज बदलतादेखील येऊ शकेल. एकदा का अर्ज केला की, एक मेसेंजर विंडो खुली हाेईल. तिच्या माध्यमातून तुम्ही रिक्रूटरशी थेट संपर्क साधू शकाल. 

बातम्या आणखी आहेत...