आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोर्ब्ज यादीत यंदा सर्वाधिक 256 अब्जाधीश महिला; मुकेश अंबानी भारतात सर्वात श्रीमंत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क- फोर्ब्जने जगभरातील श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली. यादीत यंदा सर्वाधिक म्हणजेच २५६ अब्जाधीश महिलांचा समावेश आहे. यातील ७२ महिलांना ‘सेल्फ मेड वूमेन’ या विभागात स्थान मिळाले. या महिलांनी स्वकर्तृत्वावर संपत्ती कमावली आहे. २५६ अब्जाधीश महिलांमध्ये ८ महिला भारतातील आहेत. जिंदल स्टीलच्या अध्यक्षा सावित्री जिंदल भारतात सर्वाधिक श्रीमंत आहेत. 


अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस जगात पहिल्या क्रमांकावर राहिले. त्यांची एकूण संपत्ती ७.२ लाख कोटी रुपये आहे. भारतात २.६ लाख कोटींच्या संपत्तीसह मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत ठरले. ३३ व्या स्थानावरून ते १९ व्या क्रमांकावर पोहोचले. भारतात अब्जाधीशांची एकूण संख्या १२१ झाली आहे. याबाबतीत भारत जगात तिसऱ्या स्थानावर आहे. मागील वेळी देशात १०२ श्रीमंत लोक होते. सध्या भारतापेक्षा अधिक श्रीमंत लोक अमेरिकेत  (५८५) आणि चीनमध्ये (३७३)  आहेत. नीरव मोदीला बाहरे काढले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यादीत ५४४ क्रमांकावरून ७६६ क्रमांकापर्यंत खाली घसरले आहेत. त्यांची संपत्ती २० हजार कोटी रुपये आहे.

 

भारतात 121 अब्जाधीश : सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदल (57 हजार कोटी)  

सर्वात तरुण श्रीमंत : पेटीएमचे संस्थापक विजय शर्मा (11 हजार कोटी रुपये)  

> श्रीमंतांच्या यादीत भारतीय महिला  8

 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, भारतातील आणि जगातील 5 सर्वश्रीमंत...

बातम्या आणखी आहेत...