आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय्य तृतीयेच्या पूर्वी सोन्याचा दरात वाढ; सोने 625, तर चांदी 800 रुपयांनी महाग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीतील तेजी पाहता स्थानिक बाजारात अक्षय्य तृतीयेच्या पूर्वी सोन्याचा दरात प्रति दहा ग्रॅम ६२५ रुपयांची वाढ नोंदवण्यात आली.दिल्लीत सोने ३२,१०० रुपयांवर पोहोचले. औद्योगिक क्षेत्रात मागणी वाढल्याने चांदीच्या दरातही ८०० रुपयांची वाढ झाली.  आता किलोमागे ४० हजार रुपये चांदीचा दर आहे. इतर चलनाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य घसरल्याने दोन्ही धातूंच्या किमतीत वाढ झाली आहे.  साडेतीन मुहूर्तांपैकी एक अक्षय्य तृतीयेला माेठ्या प्रमाणावर साेन्याची खरेेदी केली जाते. तज्ज्ञांच्या मते, या दिवशी सोन्याचा दर ८०० ते ९०० रुपयांनी वाढून ग्राहकांना प्रति दहा ग्रॅमसाठी ३३,००० रुपये मोजावे लागू शकतील.

बातम्या आणखी आहेत...