आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीतील मेट्रो प्रकरणात रिलायन्स इन्फ्राच्या बाजूने हायकोर्टाचा निकाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्ली न्यायालयात दिल्ली मेट्रोच्या विरोधात सुरू असलेल्या प्रकरणात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाजूने निकाल आला आहे. मागील सात मे रोजी तीनसदस्यीय लवादाने “दिल्ली रेल्वे मेट्रो काॅर्पोरेशन’ (डीएमआरसी) ला २,९५० कोटी रुपयांची भरपाई व्याजासह देण्याचे आदेश दिले होते. उच्च्य न्यायालयानेही हा निर्णय कायम ठेवला आहे. त्याचबरोबर डीएमआरसीला ३,५०२ कोटी रुपये चार आठवड्यांच्या आत एस्क्रो अकाउंटमध्ये जमा करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे ५,०६० कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा रिलायन्स इन्फ्राच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. कंपनी या पैशाचा वापर कर्जाची परतफेड करण्यासाठी करणार आहे. या प्रकरणात दिल्ली मेट्रो प्रकल्पाचा विकास-व्यवस्थापन करण्याचे कंत्राट रिलायन्स इन्फ्राकडे होते. मात्र, “सिव्हिल स्ट्रक्चर’मधील त्रुटी दूर करण्यात कंपनी अपयशी ठरत असल्याचा आरोप करत २०१२ मध्ये हे कंत्राट रद्द करण्यात आले होता. त्यानंतर अपिलीय लवादाने रिलायन्स इन्फ्राच्या बाजूने निर्णय दिला होता.
बातम्या आणखी आहेत...