आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील 100 मोठ्या शस्त्रास्त्रांच्या व्यापारात 15 वर्षांत 38% वाढ; अमेरिका प्रथम स्थानी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टॉकहोम- गेल्या १५ वर्षांत जगभरात १०० मोठ्या शस्त्रास्त्रांचा व्यापार ३८% वाढला आहे. २०१६ पासून आतापर्यंत या व्यापारात १.९% वाढ झाली आहे. जगभरात शस्त्रास्त्रांचा जेवढा व्यापार झाला, त्यात सर्वाधिक ५७.९% वाटा अमेरिकेचा होता. दुसऱ्या स्थानी ब्रिटन आणि तिसऱ्या स्थानी रशिया होता. भारताचाही जगाच्या शस्त्रास्त्र व्यापारात १.६% वाटा आहे. यादीत भारत ११ व्या स्थानी आहे. शस्त्रास्त्र व्यापारात २.२% हिश्श्यासह दक्षिण कोरियाही टॉप-१० मध्ये आहे, पण उत्तर कोरिया यादीत नाही. या सर्व बाबी स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय शांतता संशोधन संस्थेच्या (एसआयपीआरआय) अहवालात समोर आल्या आहेत. 


अहवालानुसार, गेल्या पाच वर्षांत प्रथमच जगात शस्त्रास्त्रांच्या व्यापारात वाढ झाली आहे. याआधी हे आकडे सतत घसरत होते. २०१६ मध्ये जगात २४ लाख कोटींच्या शस्त्रास्त्रांचा व्यापार झाला. अमेरिकेत एकूण १३ लाख कोटींचा व्यापार झाला. त्यात मोठा वाटा अमेरिकेचा शस्त्रास्त्र निर्माता लॉकहीड मार्टिनचा राहिला. लाॅकहीडने ब्रिटन, इटली,नॉर्वेसोबत एफ-३५ चा करार केला होता. रणगाडे बनवणाऱ्या जर्मनीच्या क्रॉस मेफई या ग्रुपनेही लष्कराच्या वाहनांचे अनेक करार केले. या करारांच्या भरवशावरच जर्मनीचा शस्त्रास्त्र व्यापारात १.६% वाटा राहिला.

 

एसआयपीआरआयचे प्रकल्प संचालक ऑड फ्लुरेंट म्हणाले की, ‘जगभरात शस्त्रास्त्रांचा व्यापार वाढला आहे. युद्धाची शक्यता वाढली आहे, असे म्हणू शकत नाही कारण या व्यापारात वाहन आणि हेल्मेट-जॅकेटसारख्या सुरक्षा उपकरणांचाही समावेश आहे. उदाहरण म्हणजे दक्षिण कोरिया. हे देश टॉप-१० मध्ये आहेत, पण त्यांचा बहुतांश व्यापार आपल्या सुरक्षेसाठीच झाला आहे, युद्ध भडकवणाऱ्या शस्त्रास्त्रांचा नाही. तरीही थोडा धोका जरूर वाढला आहे.’


चीन आणि उत्तर कोरियाचे नाव यादीत नसल्याने स्वत: फ्लुरेंटही हैराण आहेत. ते म्हणाले, ‘यादी तयार करताना आम्हाला याची जाणीव झाली होती. पण आमच्याकडील माहितीच्या आधारे यादी तयार केली. चीनच्या शस्त्रास्त्र आणि युद्ध साहित्य निर्मात्या कंपन्या जगात टॉप-२० त आहेत, तरीही त्या या यादीत नाहीत. चीन आपल्या देशाचे जास्त आकडे जाहीर करत नाही हे त्याचे कारण आहे.’

बातम्या आणखी आहेत...