आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यवसायात ‘पॅसिव्ह इन्कम प्लॅन्स’ वापरून वाढवा स्वत:चे उत्पन्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यवसाय व नाेकरीत उत्पन्न हा एक महत्त्वाचा मुद्दा  अाहे. त्यामुळे प्रत्येक जण उत्पन्नवाढीचा विचार करत असताे; परंतु चांगली बाब ही अाहे की, दर महिन्याच्या निश्चित रकमेशिवायही उत्पन्नात वाढ हाेण्यासाठी अाता अनेक मार्ग अाहेत. विशेषत: आंत्रप्रेन्योर्स मंडळींसाठी. त्यासाठी तुम्हास पॅसिव्ह इन्कमचा विचार करावा लागेल. 


पॅसिव्ह इन्कम म्हणजे कमी परिश्रमात जास्त उत्पन्न. त्या अंतर्गत काही क्रिएटिव्ह धाेरणांच्या माध्यमातून कंपनीचा महसूल वाढवला जाऊ शकताे. त्यासाठी स्वत:च्या गरजा, सुविधा व काैशल्यांनुसार काही मार्ग स्वीकारले जाऊ शकतात. येथे जाणून घ्या काही पॅसिव्ह प्लॅन्सबाबत, ज्यांचा वापर तुम्ही व्यवसायात स्वत:चे उत्पन्न वाढवण्यासाठी करू शकता...

 

सायलेंट बिझनेस पार्टनर

प्रसिद्ध उद्याेगपती रतन टाटा यांनी सायलेंट गुंतवणूकदार म्हणून पेटीएम, ओला, जियोमीत पैसे गुंतवले. तुम्हीदेखील एखाद्या व्यवसायात सायलेंट इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्याच कंपनीत काम करावे असे गरजेचे नाही. कालांतराने तुमची गंुंतवणूक फळे देऊ लागेल. पैसे काेठे गुंतवायचे? याचा निर्णय अावडीनुसार घेऊ शकता. 

 

फ्रँचायझी मॉडेल 
नियमित उत्पन्नासाठी तुम्ही कोणत्याही अशा व्यवसायाचे मॉडेल विकसित करू शकता, जो तुम्हास फ्रँचायझी संस्थांशी जुळण्यास मदत करू शकेल. त्यात मानधन, कमिशन वा फायदा वेगवेगळा असू शकताे. उदाहरणार्थ बास्किन रॉबिन्स, मॅकडोनाल्ड, पिझ्झा हट या कंपन्यांची फ्रँचायझी घेऊन अनेक उद्याेगपती माेठा फायदा कमावत अाहेत. 

 

सदस्यत्वावर अाधारित व्यवसाय 
ही पद्धतदेखील तुमच्यासाठी फायद्याची सिद्ध ठरू शकते. बीटूबी सर्व्हिसेसमध्ये वेगवेगळी व्यवसाय क्षेत्रे जसे- जिम, स्पा, सलून, क्लब्जमध्ये ग्राहकांना चांगल्या ऑफर देणे  हेदेखील फायदेशीर ठरू शकते. उदा.- महिनाभराचे माेठे शुल्क देण्याएेवजी संपूर्ण वर्षभराचे सदस्यत्व स्वीकारल्यास शुल्कात कपात यासारखे पर्याय आजमावू शकता. यामुळेही तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. 

 

फायदा हा मर्यादित नसावा 
जर तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपर असाल, तर तुमच्या साॅफ्टवेअरला एकदाच माेठ्या किमतीत विकण्याएेवजी वार्षिक सब्सक्रिप्शनच्या आधारे विकल्यास अधिक फायदा होऊ शकताे. उदा.- एडोबने सुरुवातीला माेठ्या किमतीच्या सेवा दिल्या, ज्यामुळे ते दीर्घकाळापर्यंत अापल्या ग्राहकांना  जाेडू शकले नाहीत; परंतु नंतर कंपनीने क्लाऊड बेस्ड सेवेचा अाधार घेतला अाणि माेठा फायदा कमावला. 

 

रिवॉर्ड पॉइंट्स 

एअर इंडिया, सिटी बँक व स्टार अलायन्ससह अनेक कंपन्या ग्राहकांना शॉपिंगदरम्यान रिवॉर्ड पॉइंट्स देतात. या माध्यमातून ग्राहक जोडून उत्पन्न वाढवले जाऊ शकते.

 

आऊटसोर्सिंगचा फायदा 

अधिक काम असल्यास तुम्ही एका निश्चित मूल्यावर फ्रीलान्सर्सकडून काम करवून घेऊ शकता. असे करणे अप्रत्यक्षपणे तुमचे उत्पन्न वाढवेल.

बातम्या आणखी आहेत...