आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनरेग्युलेटेड डिपॉझिट स्किम्स विधेयकाला मंजूरी, बिटकॉइन्स सारख्या क्रिप्टो करंसीवर लागणार लगाम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाने अनरेग्युलेटेड डिपॉझिट स्कीम विधेयक आणि चिटफंड (संशोधन) विधेयकाला मंजुरी दिली आहे. या विधेयकांचा उद्देश बिटकॉइन्स सारख्या व्हर्च्युअल करंसीला रोखणे आहे. विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी मिळाल्यानंतर संसदेत सादर केले जाईल. तिथे याला मंजूरी मिळाल्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर होईल. 

 

व्हर्च्युअल करंसी ट्रेडिंगवर नियंत्रण नाही 
- या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर चिटफंड सारख्या डिपॉझिट स्किम्स, ज्यावर सरकारचे नियंत्रण नाही ते बेकायदेशीर ठरणार आहेत. 
- सध्या व्हर्च्युअल करंसीच्या ट्रेडिंगबद्दल कोणतेही नियम नाहीत. वास्तविक देशात याच्या ट्रेडिंगवर बंदी नाही. 
- आरबीआयने वेळोवेळी स्पष्ट केले आहे की बिटकॉइन्स सारख्या व्हर्च्युअल करंसीमध्ये नागरिकांचे काही नुकसान झाले तर त्याला ते स्वतः जबाबदार राहातील.  

बातम्या आणखी आहेत...