आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीरव मोदीने त्याच्या ब्रँडच्या जाहिरातीतही दिले होते फरार होण्याचे संकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पीएनबीमध्ये झालेल्या 11300 कोटींच्या घोटाळ्यानंतर नीरव मोदी चर्चेत आला आहे. त्याने असा काही हजारो कोटींचा खेळ केला की, अनेक वर्षे सरकार आणि बँकेलाही त्याचा सुगावा लागला नाही. पण नीरव मोदीने तो असे करणार असल्याचे संकेत आधीच दिले होते, हे तुम्हाला माहिती आहे का. त्याबाबत आम्ही आज सांगत आहोत. 


व्हिडिओ होतोय व्हायरल 
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नीरव मोदी ब्रँडच्या एका जाहिरातीचा आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर असे म्हटले जात आहे की, नीरव मोदीने कर्ज घेऊन फरार होण्याचा कट आधीच रचला होता. 


काय आहे व्हिडिओमध्ये 
नीरव मोदी डायमंडच्या या सुमारे अडिच मिनिटांच्या जाहिरातीच्या व्हिडिओमध्ये बॉलिवूड कलाकार सिद्धार्थ मल्होत्रा आणि प्रियांका चोप्रा दिसत आहेत. व्हिडिओत्या 45 व्या सेकंदापासून ते 50 व्या सेकंदादरम्यान लोन आणि फरार होण्याबाबत प्रियांका बोलत अशल्याचे दिसते. हा व्हिडिओ नीरव मोदी नावाच्या यूट्यूब चॅनलवर 14 फेब्रुवारी 2017 ला अपलोड करण्यात आला होता. 17 लाख 70 हजारांहून अधिक व्ह्यूज या व्हिडिओला आहेत. काही लोक या व्हिडिओतील तेवढीच क्लीप शेअर करत आहेत. 


पुढे वाचा प्रियांकाने, दाखल केला आहे खटला..
 

बातम्या आणखी आहेत...