आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीरव मोदीची कंपनी दिवाळखोरीत निघणार, अमेरिकी कोर्टात याचिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क- भारतातील सर्वात मोठा बँकिंग घोटाळ्याचा आरोपी हिरे व्यावसायिक नीरव मोदीची कंपनी फायरस्टार डायमंड इंकने अमेरिकेत दिवाळखोरीच्या कारवाईसाठी अर्ज केला आहे. सोमवारी याबाबतचा अर्ज न्यूयाॅर्कच्या दिवाळखोरी प्रकरणाच्या न्यायालयात देण्यात आला.  


रोकड रक्कम व पुरवठा साखळीची समस्या हे यामागचे कारण सांगण्यात आले आहे. नीरव मोदी व मेहुल चौकसीवर १२,७१७ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. घोटाळा समोर आल्यानंतर भारतातील त्यांची सर्व बँक खाती गोठवण्यात आली आहेत. त्यांच्या स्टोअर्सवर छापे टाकून सुमारे ६००० कोटी रुपयांचे हिरे, सोने व दागिने जप्त केले आहेत.  


दिवाळखोरीच्या अर्जात फायरस्टारच्या दोन सहयोगी कंपन्यांची नावे दिली आहेत. यात ए.जॅफे इंक व फँटसी इंक असून ए. जॅफे लग्नाच्या दागिन्यांचा व्यवसाय करते. अर्जात कंपनीवर ३२५ कोटी ते ६५० कोटी रुपयांपर्यंत देणे असल्याचे सांगितले. ५० ते ९९ कोटींपर्यंत येणे आहे. फायरस्टार डायमंडचा हिरे व्यापार अमेरिकेशिवाय युरोप व मध्य पूर्व देशांत विस्तारला आहे. 

 

 पीएनबी शेअर्समध्ये १२% घसरण

घोटाळ्याच्या व्याप्ती वाढल्याची माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी पीएनबीच्या समभागात मोठी घसरण आली. मुंबई शेअर बाजारात त्यांचे समभाग १२.११% घसरणीसह ९८.३५ रुपयांवर बंद झाले. दिवसभराच्या व्यवहारात हे ९६.१० रुपयांपर्यंत चालले होते. हा याचा एक वर्षातील नीचांक आहे. १४ फेब्रुवारीला घोटाळा समोर आल्यानंतर ६४% घसरण झाली होती. मेहुल चौकसीची लिस्टेड कंपनी गीतांजली जेम्सही यादरम्यान ६४% घसरली. मंगळवारी त्याचे समभाग ५% घसरून २२.४५ रुपयांवर आले.  

 

हिरे-दागिन्यांशी संबंधित सर्व खात्यांची बँकेकडून चौकशी  

पीएनबी घोटाळ्यानंतर बँक हिरे व दागिन्यांशी संबंधित खात्याची चौकशी करत आहे. ज्वेलर राउंड ट्रिपिंग तर करत नाही ना, याचा शोध घेतला जात आहे. यामध्ये एकच वस्तू अनेकदा आयात करून निर्यात केली जाते. आयातीसाठी बँकेकडून स्वस्त कर्ज मिळते. निर्यात कंपनी एशियन स्टारचे एमडी विपुल शहा यांच्यानुसार ५ वर्षंापूर्वी या उद्योगात खूप प्रयत्नाने कर्ज मिळत होते. आता पुन्हा ही समस्या आली आहे. जेम्स-ज्वेलरी विभागास बँकांनी सुमारे ७० हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. यामध्ये २.९% रक्कम अनुत्पादित मालमत्ता आहे.  कंपन्या कच्चे हिरे खरेदी करण्यासाठी बँकेकडून लघु मुदतीचे कर्ज घेतात. कटिंग-पॉलिशिंगनंतर त्यांची विक्री होते. मात्र, आता बँक हे कर्ज देण्यास धजावत नाही. स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने २०१६ मध्ये डायमंड फायनान्सिंग बिझनेसमधून काढण्याची घोषणा केली होती. त्या वेळी ते उद्योगातील मोठे वित्त पुरवठादार होते. २०१३ मध्ये विनसम डायमंड अँड ज्वेलरीला बँकांनी थकबाकीदार घोषित केले. त्यांच्यावर ६८०० कोटींचे कर्ज होते. 

 

 

> जगात विकणाऱ्या प्रत्येक १४ हिऱ्यांपैकी १२ चे कटिंग-पॉलिशिंग भारतात होते. गेल्या वर्षी येथून ४३ अब्ज डॉलरची जेम्स- ज्वेलरीची निर्यात झाली होती. ही कारखान्यात तयार वस्तूंच्या एकूण निर्यातीच्या १६% होते.

बातम्या आणखी आहेत...