आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीजेच्या बिलात होणार 65 टक्क्यांची बचत, या कंपनीने बाजारात आणला खास AC

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - उन्हाळा सुरू होताच एअर कंडिशनर्स म्हणजे (एसी) चा व्यवसाय तेजीत येतो. पण वीजेशिवाय एसीची मजा कशी अनुभवणार हेही सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे मार्केटमध्ये काही अशा कंपन्याही आहेत, ज्या इनव्हर्टरवर चालणारे एसी तयार करत आहे. त्यापैकीच एक म्हणजे मिर्क इलेक्ट्रॉनिक्स. ओनिडा ब्रँडची मालकी असलेल्या मिर्कने एसी सेगमेंटमध्ये त्यांचा रेव्हेन्यू डबल म्हणजे सुमारे 720 कोटीवर नेण्याचा निर्णय घेतला आहे. हेच लक्ष्य समोर ठेवून कंपनीने 84 इनव्हर्टर एसीची नवी रेंज सोमवारी लाँच केली. 


जगातील कोणत्याही कोपऱ्यातून कंट्रोल होईल हा AC 
2017 या आर्थिक वर्षात कंपनीची एसी सेगमेंटमधील विक्रीची टक्केवारी 48 % (364 कोटी रुपये) एवढी होती. मिर्क इलेक्ट्रॉनिक्सने एका स्टेटमेंटमध्ये म्हटले की, कंपनीच्या एसीची नवी रेंज 170 टक्के वेगवान आणि पॉवरफुल कुलिंग देईल. तसेच वीजेच्या बिलातही 65 टक्के बचत होईल. कंपनीचा स्मार्ट इनव्हर्टर एसी आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्स) युक्त आहे. त्यामुळे स्मार्टफोनद्वारे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून हा एसी ऑपरेट करता येईल. 


5 वर्षांत प्रथमच 1600 कोटींच्या बिझनेसचे टार्गेट 
भारतात एसीचे एकूण मार्केट 2022 पर्यंत वाढून 2.2 कोटींवर जाईल. सध्या हा आकडा 56 लाख आहे. कंपनीला अपेक्षा आहे की, त्यांचा एसीचा व्यवसायही आगामी पाच वर्षांत वाढून 1500-1600 कोटींवर जाईल. मिर्क इलेक्ट्रॉनिक्सचे सीईओ जी सुंदर यांचे म्हणणे आहे की, स्प्लिट एसीमध्ये आमचे मार्केट साइज सध्या 8 टक्के आहे. आगामी काळात देशात एसीची मागणी वाढल्यानंतर हा आकडा दुप्पट होईल. क्रयशक्ती वाढल्याने आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे देशाच एसीची डिमांड वाढत आहे. 


पुढे वाचा, भारतात कोणत्या कंपन्या तयार करतात AC...

 

बातम्या आणखी आहेत...