आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएनबीला ‘मिशन गांधीगिरी’ मधून 1,800 कोटींच्या कर्ज वसुलीची अपेक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चौकसी पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) कोट्यवधी रुपयांचा चुना लावून देशातून फरार झाले असले तरी बँकेने त्यांचे ‘मिशन गांधीगिरी’ सुरूच ठेवले आहे. या मिशनमुळे बँकेच्या अनुत्पादित कर्जातील (एनपीए) सुमारे १,८०० कोटी रुपये वसूल होण्याची अपेक्षा असल्याचा दावा पीएनबीने केला आहे.

 

‘मिशन गांधीगिरी’ला लवकरच एक वर्ष पूर्ण होणार असल्याचे पीएनबीमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. हे मिशन बँकेने मे २०१७ मध्ये लाँच केले हेाते. यातून आतापर्यंत सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. आतापर्यंत या मोहिमेची सरासरी वसुली १५० कोटी रुपये नोंदवण्यात आली आहे. थकबाकीदाराकडून वसुली करण्यासाठी सामाजिक दबाव वाढवणे आणि कर्ज भरण्यासाठी ‘नेम अँड शेम’ची आवश्यकतेतून या मिशनचा उदय झाला आहे. ‘मिशन गांधीगिरी’ अंतर्गत बँकेच्या सर्व विभागात वसुली करण्यासाठी स्वतंत्र टीम तयार करण्यात येते. या अप्रत्यक्ष रिकव्हरी प्रणालीत सहभागी असलेले सदस्य थकबाकीदारांच्या घरी किंवा कार्यालयात जातात. त्यांच्यासोबत बसून आरामशीर चर्चा करतात. हा जनतेचा पैसा असून कृपया कर्जाची परतफेड करा, अशा प्रकारचा संदेश थकबाकीदाराला दिला जातो, तर दुसरीकडे कायदेशीर प्रक्रियेअंतर्गत सहेतुक कर्ज न भरणाऱ्याविरोधात सरकारच्या वतीने जारी निर्देशानुसार पीएनबीने १,०८४ थकबाकीदारांची यादी घोषित केली आहे.


१५० पासपोर्ट जप्त : बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सहेतुक थकबाकीदारांबाबत पंजाब नॅशनल बँक कडक पावले उचलत आहेत. मागील काही महिन्यांत बँकेच्या कारवाईत १५० पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त मागील नऊ महिन्यांत अशा थकबाकीदारांच्या विरोधात ३७ एफआयआर दाखल केले आहेत.

 

डाटा अॅनालिटिक्सचीही मदत  
अधिकाऱ्याने सांगितले की, बँक कर्जाची वसुली आणि रिस्क मॅनेजमेंटअंतर्गत आकडेवारीच्या तपासणीसाठी डाटा अॅनॉलिटिक्सचीही मदत घेत आहे. यासाठी पीएनबीने एका प्रमुख संस्थेसोबत करार केला आहे. थर्ड-पार्टी एक्स्पोर्ट अॅनालिटिक्‍सच्या मदतीमुळे बँक अशा थकबाकीदारांशी (ज्यांचे इतर बँकांसोबतही चांगले क्रेडिट रेकॉर्ड नाही) संपर्क करण्याची माहिती मिळवण्यास सक्षम होईल.

बातम्या आणखी आहेत...