आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजारात घसरणीची शक्यता; वीकली इकॉनॉमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय शेअर बाजारात प्रमुख शेअरमध्ये झालेल्या विक्रीच्या माऱ्यामुळे मंगळवारी व्यवहाराच्या सलग पाचव्या सत्रात घसरण नोंदवण्यात आली. असे असले तरी बाजार सकारात्मक धारणेसह सतर्क होता. मात्र, दुपारनंतर बँकांच्या शेअरमध्ये सुरू झालेल्या विक्रीच्या माऱ्यामुळे बाजारात मोठी घसरण झाली. निफ्टीत समावेश असलेला बँकांचा निर्देशांक सहा जानेवारी २०१७ नंतर पहिल्यांदाच २०० दिवसांच्या “सिम्पल मूव्हिंग अॅव्हरेज’च्या खाली येऊन बंद झाला.   


पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर एसएफआयओच्या वतीने ३१ बँकांच्या प्रमुखांना चौकशीसाठी बोलावण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. हे वृत्त बाजारात धडकताच बँकांच्या शेअरमध्ये झालेल्या विक्रीच्या माऱ्यामुळे ही घसरण झाली आहे. त्या आधी आशियाई बाजारात आलेल्या तेजीमुळे तयार झालेल्या सकारात्मक धारणेला ग्रहण लावण्याचे काम या वृत्ताने केले. अमेरिकेत स्टील आणि अॅल्युमिनियमवर आयात शुल्कात प्रस्तावित वाढीचा निर्णय मागे घेण्यासाठी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर राजकीय सहकारी दबाव वाढवत आहे. त्यामुळे जगात व्यापारी युद्ध सुुरू होण्याची गुंतवणूकदारांची भीती काही प्रमाणात कमी झाली आहे. यामुळे आशियाई बाजारात तेजी नोंदवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त जर्मनीमध्ये स्थायी सरकार आल्याने युरोच्या किमतीत वाढ होण्यास मदत मिळाली असल्याने युरोपातील धोका कमी झाला आहे. यामुळे आशियाई बाजारातील धारणा मजबूत झाली आहे. बँकिंग क्षेत्रातील घोटाळ्याचा परिणाम अर्थव्यवस्थांवर पडण्याची शक्यता असल्याने शेअर बाजाराची धारणा बिघडलेली दिसत आहे.   


जागतिक पातळीवर वॉल स्ट्रीटमध्ये मंगळवारी तेजी राहिली. यात उत्तर कोरिया आणि अमेरिकेदरम्यान चर्चा होण्याची शक्यता वाढण्याचे मुख्य योगदान राहिले. आर्थिक स्थितीत सर्व निर्देशांक अमेरिकी अर्थव्यवस्था मजबूत असल्याचेच संकेत देत असून हे सर्व सकारात्मक संकेत आहेत. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी निर्देशांक मंगळवारी १०९.६० अंकांच्या (१.०६ टक्के) घसरणीसह १०२४९.२५ या पातळीवर बंद झाला. तांत्रिकदृष्ट्या भारतीय शेअर बाजार सध्या तरी कमजोर दिसत आहे. घसरण झाल्यास निफ्टीला पहिला आधार १०१७५ या पातळीच्या जवळपास मिळण्याची शक्यता आहे. हा एक मध्यम आधार असेल. जर निफ्टी यात पातळीच्या खाली येऊन बंद झाला तर आणखी घसरण दिसण्याची शक्यता आहे. अशा वेळी निफ्टीला पुढचा अाधार १००१९ या पातळीवर मिळेल. हा एक मध्यम आधार असेल. तेजीचा विचार केल्या निफ्टीला पहिला अडथळा १०३४३ च्या जवळपास मिळेल. हा एक मध्यम अडथळा असेल. बाजारात तेजी वाढल्यास हा अडथळा निफ्टीला थांबवू शकणार नाही. असे झाल्यास निफ्टीला पुढचा अडथळा १०४२७ च्या जवळपास मिळेल. 


शेअरमध्ये या आठवड्यात हैवल्स इंडिया आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज मजबूत स्थितीत दिसत आहे. हैवल्स इंडियाचा सध्याचा बंद भाव ५०३.०० रुपये आहे. यात ५१२ रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता असून घसरणीत याला ४८९ रुपयांवर स्टॉपलॉस लावावा. एचसीएल टेकचा सध्याचा बंद भाव ९४९.०० रुपये आहे. घसरणीमध्ये याला ९१५ रुपयांवर स्टॉपलॉस लावावा.

 

आर. जगन्नाथन

लेखक आर्थिक प्रकरणाशी संबंधित ज्येष्ठ पत्रकार,‘डीएनए’ चे संपादक होते. 
rjagannathan@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...