आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युको बँकेत 621 कोटींचा घोटाळा; दिल्लीत आठ, तर मुंबईत दोन छापे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सीबीआयने युको बँकेचे माजी सीएमडी अरुण कौल आणि इतरांविरोधात ६२१ कोटी रुपयांच्या कथित कर्ज फसवणूकप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या फसवणुकीमुळे बँकेचे ७३७.८८ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तपास संस्थेने यासंबंधी शनिवारी १० जागी छापे मारले. यातील आठ छापे दिल्लीत, तर दोन छापे मुंबईत मारण्यात आले. या प्रकरणात सीबीआयने कौल यांच्याव्यतिरिक्त एरा इंजिनिअरिंग इन्फ्रा इंडिया लिमिटेड (ईईआयएल) या कंपनीचे सीएमडी हेमसिंह भडाना, दोन सीए पंकज जैन आणि वंदना शारदा, अल्टियस फिनसर्व्ह प्रा. लि.चे पवन बन्सल यांच्याव्यतिरिक्त अज्ञातांना आरोपी केले आहे.  


सीबीआयच्या प्रवक्त्यांनी शनिवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आरोपींनी फसवणुकीच्या उद्देशाने कर्जात हेराफेरी करून युको बँकेला सुमारे ६२१ कोटी रुपयांचा धोका दिला. ज्या कामासाठी बँकेने कर्ज मंजूर केले होते, त्या कामासाठी कर्जाचा वापर न करता इतर कामांसाठी करण्यात आला असल्याचा सीबीआयचा आरोप आहे. कोलकात्यामध्ये मुख्यालय असलेल्या या बँकेत २०१० ते १०१५ दरम्यान कौल सीएमडी होते. त्यांच्यावर आरोपींना कर्ज देण्यासाठी मदत करण्याचा आरोप आहे. हे कर्ज सीएंच्या खोट्या प्रमाणपत्राच्या तसेच खोट्या व्यापारी आकड्यांच्या अाधारावर देण्यात आले होते.  

 

पीएनबी घोटाळ्यानंतर समोर आले अनेक घोटाळे  

पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) १३,००० कोटी रुपयांच्या कर्जाचा घोटाळा समोर आल्यानंतर अनेक बँकांमध्ये असे घोटाळे समोर आले आहेत. यामध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, एचडीएफसी बँकेसह इतर बँकांचा समावेश आहे. पीएनबी घोटाळ्यात आमचेही नुकसान झाले असल्याचे याआधी १७ फेब्रुवारी रोजीच युको बँकेने सांगितलेेे होते. यात बँकेचे ४१.१८ कोटी डॉलर (सुमारे २,६३६ कोटी रुपये) अडकले आहेत. बँकेने मागील एक एप्रिल रोजी बंगळुरूमध्ये १९.०३ कोटी रुपयांच्या कर्ज फसवणुकीची तक्रार दिली होती. यात २०१३ आणि २०१६ दरम्यान बँकेच्या अधिकाऱ्यांनी १८ कर्ज प्रकरणे मंजूर केली असल्याचा आरोप आहे. सीबीआयने बँकेचे माजी व्यवस्थापक केआर सरोजांसह बँकेच्या इतर माजी कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

 

दोन कर्ज प्रकरणात झाली फसवणूक  

 

बँकेची तक्रार जी आता सीबीआयच्या एफआयआरचा भाग आहे, यात आरोप करण्यात आला आहे की, ईईआयएलला मार्च २०१० मध्ये २०० कोटी रुपये आणि ऑक्टोबरमध्ये ४५० कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले होते. २०० कोटींचे कर्ज सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पीएनबी आणि आयएफसीआयच्या महागड्या कर्जाच्या पुनर्भरणासाठी जारी करण्यात आले होते. मात्र, ही रक्कम इतर कामावर खर्च करण्यात आली. केवळ आयएफसीआयला ५९ लाख रुपये भरणा करण्यात आला. या प्रकरणात सीए  पंकज जैन यांनी चुकीची माहिती देत अँड-यूज प्रमाणपत्र दिले.  तर दुसरीकडे ४५० कोटी रुपयांचे कर्जही स्वीकृत उद्देशावर खर्च न करता इतर ठिकाणी करण्यात आला. सीए वंदना शारदा यांच्या वतीने जारी करण्यात आलेल्या अँड-यूज प्रमाणपत्रातही मुद्दाम अस्पष्ट माहिती देण्यात आली. हे दोन्ही कर्ज खाते ७ जुलै २०१३ पर्यंत एनपीए घोषित करण्यात आले. ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत या कर्जाची थकीत रक्कम ७३७.८८ कोटी रुपये झाली.  

बातम्या आणखी आहेत...