आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट फोन ओक्वू-सिग्मा अन् ओक्वू यू-फ्लाय बाजारात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-   भारतीय मोबाइल निर्मिती कंपनी ओक्वूने ओक्वू-सिग्मा आणि ओक्वू-यू-फ्लाय हे  दोन स्मार्ट फोन बाजारात आणले आहेत. दोन्ही स्मार्ट फोन नवीन फीचर्ससोबत मोबाइल युजरला अधिक कार्यक्षम करण्याचा प्रयत्न करतील. फोनचे डिझाइन आकर्षक आणि सुंदर करताना प्रत्येक बाबीवर सूक्ष्म लक्ष ठेवले असल्याचे ओक्वूचे व्यवस्थापकीय संचालक  अंशुमन अतुल आणि सीईओ अर्जुन गुप्ता यांनी सांगितले. अनेकदा फोनमधील सुविधांमध्ये फॉर्म फॅक्टरची चर्चा खूप कमी होत असल्याचेही ते म्हणाले. मोबाइल इंडस्ट्रीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान सादर करण्यावर ओक्वूचा प्रयत्न असून प्रत्येक  पिढीतील लोक या मोबाइलचा वापर करू शकतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. डिमांडिंग लाइफ स्टाइलचा  पाठपुरावा करणाऱ्या युजर्सना या फोनचा खऱ्या अर्थाने फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.